Navi Mumbai To chipi Airport news AI Image
महाराष्ट्र

Flight Ticket Rate : कोकणवासियांसाठी मोठी खूशखबर! आता विमानाने करा स्वस्त अन् मस्त प्रवास; पाहा काय आहेत तिकिटाचे दर

Navi Mumbai To Konkan Flight Ticket Price : गणेशोत्सवाच्या काळात कोकण गाठणे आता अधिक सोपे होण्याची शक्यता आहे. नवी मुंबई–सिंधुदुर्ग थेट विमानसेवेची तयारी सुरू असून, प्रवासाचे भाडे सुमारे ₹3,580 पासून असण्याची शक्यता आहे.

Alisha Khedekar

  • नवी मुंबई–सिंधुदुर्ग थेट विमानसेवा सुरू करण्याची तयारी जोरात सुरू

  • नवी मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवासाचे भाडे सुमारे ₹3,580

  • परतीच्या सिंधुदुर्ग–नवी मुंबई प्रवासासाठी सुमारे ₹3,735 भाडे

  • गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक जलद आणि सोयीचा होणार

गणेशोत्सवाच्या काळात अनेक जण सापडेल त्या वाटेने गावी जातात. कोणी रेल्वेचा पर्याय निवडला, कोणी बसचा तर कोणी स्वतःच्या कारने कोकणाची वाट धरतो. मात्र आता कमी वेळात कोकण गाठणे सोपे होणार आहे. कारण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ यांच्यात थेट विमानसेवा सुरू करण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. या विमान प्रवासाचे भाडेही सर्वसामान्यांना परवडेल असे असून जाहीर करण्यात आले आहे.

कोकण किनारपट्टीला थेट मुंबईच्या व्यापारी केंद्राशी जोडण्यासोबतच सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने ही विमानसेवा महत्त्वाची मानली जात आहे. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर या विमानतळावरून कोकणाशी थेट हवाई संपर्क निर्माण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई ते सिंधुदुर्ग या मार्गावरील विमान प्रवासाचे भाडे सुमारे ३,५८० रुपये, तर सिंधुदुर्ग ते नवी मुंबई परतीच्या प्रवासासाठी सुमारे ३,७३५ रुपये असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेळ वाचवून कोकण गाठू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी हा पर्याय महत्त्वाचा ठरू शकतो.

दरम्यान, विमानसेवा सुरू करताना विमान कंपन्यांवर काही कडक अटी व शर्ती लागू करण्यात येणार आहेत. विमानसेवेचे नियमन योग्य पद्धतीने व्हावे, प्रवाशांना सुविधा मिळाव्यात आणि सेवा सातत्याने सुरू राहावी, यासाठी प्रशासनाकडून आवश्यक नियम निश्चित केले जात आहेत.

ही थेट विमानसेवा लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फायदा होणार आहे. मुंबई ते कोकण प्रवासाचा वेळ कमी करण्यासोबतच सिंधुदुर्गातील पर्यटन आणि स्थानिक व्यवसायांनाही या हवाई जोडणीमुळे नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना गणपती बाप्पा पावला! १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात; तुमच्या मोबाईलवर SMS आला का?

ज्ञानेश कुमारांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव, 13 कोटी मतदार वगळल्याच्या चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT