Mumbai Shirdi Vande Bharat  AI Image
महाराष्ट्र

Shirdi Vande Bharat : रेल्वेचा मोठा निर्णय! महाराष्ट्रातली पहिली वंदे भारत एक्स्प्रेस 'या' स्थानकावरही थांबणार, कोणाला होणार फायदा?

Maharashtra Shirdi Vande Bharat News : मुंबई-शिर्डी वंदे भारत एक्सप्रेसला मनमाड रेल्वे स्थानकावर आजपासून नियमित थांबा मिळाला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Alisha Khedekar

अजय सोनवणे, नाशिक

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आता मनमाड रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या स्टेशनवर आजपासून नेहमी ट्रेन थांबवली जाईल. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांना यामुळे मोठा फायदा होणार आहे. विशेषतः शिर्डीला जाणाऱ्या भाविकांसाठी आणि मुंबईकडे प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.

यापूर्वी वंदे भारत एक्सप्रेस मनमाड रेल्वे स्टेशनवर काही कारणांसाठी थांबवली जायची. त्यामुळे प्रवाशांना या स्थानकावरून गाडीत चढता किंवा उतरता येत नव्हते. त्यामुळे मनमाड परिसरातील प्रवाशांना या ट्रेनने प्रवास करता यावा, यासाठी अनेक दिवसांपासून नियमित थांबा देण्याची मागणी केली जात होती.

दरम्यान प्रवाशांची गरज लक्षात घेऊन अखेर रेल्वे प्रशासनाने मनमाड येथे वंदे भारत एक्सप्रेसला व्यावसायिक थांबा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे प्रवाशांची मागणी पूर्ण झाली असून, परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. आज मनमाड रेल्वे स्थानकावर या थांब्याच्या सुरुवातीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी भुसावळ रेल्वे विभागातील अधिकारी, मनमाडचे नगराध्यक्ष आणि विविध राजकीय नेते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गाडीला हिरवा झेंडा दाखवून या नव्या थांब्याचे स्वागत करण्यात आले.

मनमाड येथे थांबा मिळाल्यामुळे शिर्डीला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनाही प्रवास अधिक सोयीचा होणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे नाशिकच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना मुंबई आणि शिर्डीला जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

तोंडलीची रस्सा भाजी कशी बनवायची? सोपी आहे पद्धत

December Bank Holiday List : डिसेंबरमध्ये बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या! RBI ने जाहीर केली यादी

Maharashtra News Live Update: धुळ्यात शेतकऱ्याचे कापूस विक्रीचे पैसे लुटल्याप्रकरणी दोघांना अटक

बंडखोर आमदारांच्या गटाला हायकोर्टाचा धक्का! प्रमुख नेत्याची निवड अवैध, विधानसभाध्यक्षांचा निर्णयही बदलला

Kitchen Tips : आले-लसूण पेस्ट लवकर खराब होतेय? जास्त दिवस टिकवण्यासाठी वापरा या सोप्या ट्रिक्स

SCROLL FOR NEXT