Mumbai Rain Updates saam tv
महाराष्ट्र

Mumbai Rain Updates: मुंबईत पवासासह वादळी वाऱ्याचा कहर, गोरेगावात झाड कोसळून तरुणाचा मृत्यू

Mumbai Rain Accidents: मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील एमजी रोड परिसरात देखील मुसळधार पावसामुळे एक झाड कोसळ्याची घटना घडली आहे.

Chandrakant Jagtap

>> संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai News : मुंबईत दोन दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील एमजी रोड परिसरात देखील मुसळधार पावसामुळे एक झाड कोसळ्याची घटना घडली आहे.

या दुर्घटेत ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. प्रेमलाल निर्मल असं मृत तरुणाचं नाव आहे. झाड कोसळून व्यक्तींचा मृत्यू होण्याची आज दिवसभरातील ही दुसरी घटना आहे.

पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पावसासोबत जोरदार वारा देखील वाहत असल्याने जुनाट झाडं कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. गोरेगाव एमजी रोड परिसरातील मीठानगर महापालिका कॉलनीत दुपारच्या सुमारास एका घरावर झाड कोसळल्याची घटना घडली. (Marathi Tajya Batmya)

या दुर्घटनेत बी 22 ए या घरात राहणाऱ्या 30 वर्षीय प्रेमलाल निर्मल या तरुणाला गंभीर दुखापत झाली. शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी गंभीर जखमी अवस्थेत त्याला जवळच असलेल्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून गोरेगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. (Latest Political News)

मुंबईत मुसळधार पावसामुळे झाडे कोसळून दुर्घटना घडण्याची ही आज दिवसभरातील दुसरी घटना आहे. पहाटे देखील मालाड पश्चिमेकडील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळून कौशल महेंद्र जोशी या 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT