Mumbai Heavy rains  SAAM TV
महाराष्ट्र

Mumbai Rain: आहाहाहाsss...घन निळा बरसला... मुंबई, उपनगरांसह राज्यात अनेक ठिकाणी कोसळल्या सरींवर सरी

Maharashtra Monsoon Updates: मान्सून आज अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत तो मुंबईतही दाखल होण्यासाठी स्थिती अनुकुल आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Rain Latest News : मुंबईत रात्रीपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. आज शनिवारी देखील सकाळपासून मुंबईसह उपनगरात ढगाळ वातावरणासह पावसाच्या मुळधार सरी बरसत आहे. या पावसामुळे कडाक्याचं उन आणि गर्मीपासून मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मान्सून आज अलिबागपर्यंत पोहोचला आहे. पुढील दोन दिवसांत तो मुंबईतही दाखल होण्यासाठी स्थिती अनुकुल आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस कोसळतोय, तर पुण्यात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मुंबईत मान्सून दाखल झाला नसला तरी पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.

अहमदनगर जिल्ह्यात मान्सूनचं आगमन

अहमदनगर जिल्ह्यात अखेर आज मान्सूनचे आगमन झालं आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्र कोरडं गेल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. आज पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी आणि नागरिक सुखावले आहेत. उकाड्याने हैराण झालेल्या नागरीकांना दिलासा मिळालाय, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी आणि लावणीचे कामं सुरू केली आहेत.

माणगावमध्ये पावसाची तुफान बॅटिंग

माणगावमध्ये सकाळपासून उघडझाप करणाऱ्या पावसाने दुपारनंतर जोर धरला. दुपारी तीन ते संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बरसलेल्या पावसाने माणगावमध्ये वाहनांना फोकस लाऊन वाहन चालवण्याची वेळ आली. या जोरदार पावसामुळे शाळकरी मुलं, पालक आणि दुचाकी स्वारांचे देखील हाल झालेत.

पारनेर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस

मागील १५ दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या मान्सूनने राज्यातील विविध भागात हजेरी लावली आहे. अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील देवीभोयरे वडझिरे या भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पहिल्याच पावसात शेतात पाणी साचले असून दोन्ही गावाच्या परिसरातील ओढे नाले भरून वाहू लागले आहेत. या पावसाने बळीराजा सुखवला आहे. (Marathi Tajya Batmya)

सोलापूर शहरात अखेर मान्सूनचें आगमन

सोलापुरात देखील पावसाचं आगमन झालं आहे. जिल्ह्यात आज जोरदार पाऊस दाखल झाला. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंद आहे. शहरातील सखल भागात पाणी साचलं असून उकड्याने हैराण झालेल्या सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे. (Latest Political News)

साताऱ्यात पावसाला सुरवात...

आज सातारा शहर आणि परिसरात देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. गेल्या दोन दिवसापासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण पसरले होते. अखेर आज दुपारी जोरदार पाऊस दाखल झाला. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs IRE: बेलफास्टमध्ये टीम इंडियाचा सुफडासाफ; आयर्लंडचा ऐतिहासिक विजय

केतन अग्रवाल हत्या प्रकरण नवी अपडेट: पोलिसांच्या नजरेतून वाचण्यासाठी चेतनने लढवली होती अनोखी शक्कल

Ben Stokes : भारत-इंग्लंडच्या सामन्यांआधी मोठी बातमी! दिग्गज क्रिकेटपटूची तडकाफडकी रिटायरमेंट, क्रिडाविश्वात खळबळ

Maharashtra News Live Update: बालबेडा जंगलात माओवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; पोलीस-सीआरपीएफची मोठी कारवाई

१,४०० किलोमीटर लांबी, ८ लेन; महाराष्ट्रासह पाच राज्यांना जोडणार द्रुतगती मार्ग, जाणून घ्या महामार्गाचे वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT