Maharashtra Rain News IMD Alert Saam Tv
महाराष्ट्र

Weather Forecast : कुठे ढगाळ, कुठे मुसळधार पाऊस; राज्यात आज कसे असेल वातावरण?

weather update in marathi : परतीच्या पावसाने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे, तरी राज्यात पाऊस पूर्णपणे थांबलेला नाही. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

Mumbai, Pune, Maharashtra, India Weather Forecast : परतीच्या पावसाने महाराष्ट्रातून माघार घेतलेली आहे. पण राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण असेल. अरबी समुद्रासह बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे सध्या देशभरात पाऊस कोसळत आहे. राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. (Maharashtra Rain News IMD Alert)

पुढील २४ तासांत राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसह कोकणात पाऊस आज हजेरी लावू शकतो. काही ठिकाणी ढगाळ वातावरणाचा इशारा देण्यात आलाय. मुंबई आणि पुण्यात आज पूर्णपणे ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज वर्तवण्यात आलाय.

राज्यात आज ढगाळ वातावरण -

हवामान विभागाने सांगितलेल्या अंदाजानुसार, राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहू शकते. यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

घाटमाथ्यावर हलक्या सरींची शक्यता -

पुण्यात आज ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर घाटपरिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये पुण्याचा काही भाग, सातारा, कोल्हापूर, सांगली येथे तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी,पालघर, रायगड, ठाणे या क्षेत्रांसह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. इतत्र हवामान ढगाळ राहू शकते.

हवेची गुणवत्ता कशी असेल?

मुंबई 115 AQI, पुणे 130 AQI अशी हवेची गुणवत्ता असेल. ज्यामुळे संवेदनशील लोकांना आरोग्यावर त्वरित परिणाम जाणवू शकतात. प्रदीर्घ काळ संपर्कात राहिल्यास निरोगी लोकांना किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येऊ शकतात. घराबाहेरील कामे मर्यादित ठेवा. 2.5 मायक्रोमीटर्सहून मोठे कण श्वसनमार्गात जमा होऊ शकतात ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. संसर्गामुळे डोळे आणि घशाचा दाह, खोकला किंवा श्वास घेण्यात अडचण आणि वाढलेला दमा हे परिणाम होऊ शकतात. अधिक वारंवार आणि अति प्रमाणातील संसर्गामुळे आरोग्यावर अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindkheda Exit Poll: पवारांचा करिष्मा चालणार का? सिंदखेडाची जनता कोणाला निवडणार? पाहा Exit Poll

Exit Poll : धीरज देशमुख पुन्हा आमदार होणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Maharashtra Exit Poll: धामणगाव मतदारसंघातून विरेंद्र जगताप होणार आमदार? पाहा Exit Poll

Nevasa Exit Poll: नेवासा मतदारसंघात कोण होणार आमदार? Exit पोलचा अंदाज काय

Exit Poll Maharashtra : राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT