Mumbai Nagpur Highway Accident: बस चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात.. खासगी बस उलटली; ७-८ प्रवासी जखमी  Saamtv
महाराष्ट्र

Mumbai Nagpur Highway Accident: चालकाला डुलकी लागल्याने भीषण अपघात.. खासगी बस उलटली; ७-८ प्रवासी जखमी

Private Bus Accident: बस चालकाला झोप आल्याने भरधाव बस वरील नियंत्रण सुटून बस पलटी झाली.

Gangappa Pujari

संजय जाधव, प्रतिनिधी...

Mumbai Nagpur Highway Accident: जुन्या मुंबई पुणे नागपूर महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली असून यामध्ये सात- ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Accicent News)

याबाबत सविस्तर माहिती अशी की, जुन्या मुंबई पुणे नागपूर महामार्गावर (Mumbai Pune Nagpur Highway) सुलतानपूर नजिक खाजगी बसला भीषण अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने भरधाव बस वरील नियंत्रण सुटून बस पलटी झाली. या अपघातात बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत.

अपघाताची (Accident) माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली. अपघातातील जखमी प्रवाशांवर सध्या मेहकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा अपघात...

पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा बस आगरातील बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. ही बस सकाळी प्रवासी घेऊन वाड्याच्या दिशेने येत असताना शहरातील खंडेश्वर नाक्यावर ट्रक व बसची जोरदार धडक झाली. या अपघातात शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ५० प्रवासी प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

Early Morning Dreams: सकाळी पडणारे स्वप्न खरंच पूर्ण होतात का?

SCROLL FOR NEXT