Satara NCP News: 'नको असलेल्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार...' रामराजेंचा भाजप खासदारांना सूचक इशारा

Ramraje Naik Nimbalkar News: सातारा जिल्ह्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून जोरदार संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे.
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkarsaam tv

ओंकार कदम, प्रतिनिधी...

Satara News: अजित पवार आणि भाजप एकत्र आल्याने राज्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. मात्र सातारा जिल्ह्यात लोकसभेच्या उमेदवारीवरून जोरदार संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजप खासदारांना तसा थेट इशाराच दिला आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Pune Breaking News: पुण्यात धावत्या PMP बसवर कोसळलं भलमोठं झाड; प्रवाशांची पळापळ, चालक जखमी

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर (RamRaje Naik Nimbalkar) आणि साताऱ्याचे लोकसभेचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) तसेच माढा मतदार संघाचे भाजपचे (BJP) खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामधील वाद काही नवीन नाही. आगामी लोकसभेच्या उमेदवारीवरुन पुन्हा एकदा हा संघर्ष पाहायला मिळणार असल्याचे दिसत आहे.

काय म्हणाले रामराजे नाईक निंबाळकर?

"सातारा (Satara) आणि माढा मतदारसंघाचा खासदार आमच्याच विचाराचा होईल. मात्र, आमच्याविरोधात असणारे आणि आम्हाला नको असणाऱ्यांचा मी यंदा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असे म्हणत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

Ramraje Naik Nimbalkar, Ranjitsinh Naik Nimbalkar
Nashik News: दिंडोरीत मध्यरात्री घराचा स्लॅब कोसळला, आजोबासह 3 वर्षीय नातवाला मृत्यूने कवटाळलं, हृदयद्रावक घटना

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. रामराजेंच्या या विधानाने अजित पवार गट (Ajit Pawar) देवेंद्र फडणवीसांचे (Devendra Fadanvis) टेंन्शन वाढवणार का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com