सचिन जाधव, साम टीव्ही
Pune Breaking News Today: पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यात धावत्या पीएमपी बसवर झाड कोसळल्याची घटना गुरुवारी (७ सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास घडली.
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. यामध्ये बसचालकाला किरकोळ जखम झाली असून इतर प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले (फर्ग्युसन) रस्त्यावर ही घटना घडली.
प्राप्त माहितीनुसार, पुणे महानगर (Pune News) परिवहन महामंडळाची अप्पर ते निगडी ही बस फर्ग्युसन रस्त्यावरून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जात होती. दरम्यान, बस फर्ग्युसन कॉलेजजवळील थांब्यावर थांबली. या थांब्यावरून काही प्रवासी बसमध्ये चढले.
मात्र, बस निघत असताना अचानक भलामोठा आवाज झाला. फुटपाथवर असलेले जीर्ण गुलमोहराचे झाड मोडून बसवर (PMP Bus) कोसळले. झाडाचा बुंधा फुटपाथवर पडला. तर, पुढील फांद्या बसच्या काचा व समोरच्या बाजूवर आदळल्या.
अचानक बसवर झाड आदळल्याने बसचालक आप्पाराव जाधव यांनी तातडीने बस थांवली. पण या घटनेत त्यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. या बसमधून ३० ते ३५ प्रवासी होते. झाड आदळल्यानंतर हे प्रवासी मागील बाजूला पळाले. पूर्ण झाड बसच्या मध्यावर पडले असते तर मोठा अनर्थ झाला असता.
घटनेची माहिती मिळताच डेक्कन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, अग्निशमन दलास घटनेची माहिती देण्यात आली. बसवर कोसळलेलं झाड बाजूला करण्यात आलं. त्याचबरोबर बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसने पाठविण्यात आले. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. यामुळे रस्त्यावर काही वेळ वाहतूक संथ झाली होती.
Edited by - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.