Maratha Reservation: सरकारकडून निरोप आल्यानंतरच मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवणार: मनोज जरांगे पाटील

Manoj Jarange Patil News: सरकारकडून निरोप आल्यानंतरच मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ चर्चेसाठी पाठवणार: मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Health Latest Updates in Marathi
Manoj Jarange Health Latest Updates in MarathiSaam TV

Maratha Reservation Latest Updates in Marathi:

''मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईत सरकारसोबत चर्चेसाठी कधी पाठवायचं, हे उद्या सरकारकडून निरोप आल्यानंतर कळवलं जाईल'', असं आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

आमच्या शिष्टमंडळात 16 ते 17 जण असतील. आम्ही आमच्यात बैठक करू. या शिष्टमंडळात मराठा आरक्षण अभ्यासक, आंदोलक,ओबीसी आरक्षण अभ्यासक, असे तज्ञ असतील. उद्या मुख्यमंत्री बाहेर जाणार आहेत. त्यांचा एक दिवसाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे सरकारचा निरोप आल्यानंतरच शिष्टमंडळ चर्चेसाठी मुंबईत पाठवलं जाईल, असंही जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Health Latest Updates in Marathi
Buldhana News: दुर्दैवी! दहीहंडीच्या कार्यक्रमात इमारतीची गॅलरी कोसळली, चिमुकलीचा जागीच मृत्यू...

उपोषण लांबवायला नको हे सरकारला समजायला हवं, पण मुंबईत सरकारकडे चर्चेसाठी शिष्टमंडळात जाणारे सर्व लोक माझ्या तालमीत तयार झालेले असून आरक्षणाचा किल्ला ते जिंकूनच येतील अन्यथा उपोषण सुरूच राहील, असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. (Latest Marathi News)

दरम्यान, मराठा समाजातील ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीच्या जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल अशा व्यक्तींनी सादर केलेल्या निजामकालीन महसुली अभिलेखात, शैक्षणिक अभिलेखात तसेच अन्य अनुषंगिक समर्थनीय अभिलेखात जर त्यांच्या वंशावळीचा उल्लेख ‘कुणबी’ असा असेल, तर अशा व्यक्तींनी सादर केलेल्या पुराव्यांची काटेकोर तपासणी करुन त्यांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र प्रदान करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

Manoj Jarange Health Latest Updates in Marathi
Konkan Alternatives Route: गणेशोत्सवासाठी कोकणात जाताय? पुणे, कोल्हापूर आणि कुठून आहेत पर्यायी मार्ग, जाणून घ्या...

त्याचप्रमाणे मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच, तपासणीअंती पात्र व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यास शासन मान्यता दिली आहे. त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या सहीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com