Mumbai-Pune Expressway Accident Saam TV
महाराष्ट्र

Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन ट्रक जळून खाक

Three Vehicle Accident: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील भातण बोगद्यात तीन वाहनांचा मोठा अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

सचिन कदम

Raigad Accident News: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. राज्यात रस्ते अपघातात आतापर्यंत अनेक निष्पाप नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. अशात महिन्याच्या पहिल्याच दिवशी रायगडमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील भातण बोगद्यात तीन वाहनांचा मोठा अपघात झाला आहे.(Latest Mumbai-Pune Expressway News)

अधिक माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील पुणे लेनवर हा अपघात झाला आहे. अपघातात तिनही वाहने जळून खाक झाली आहेत. भाताण बोगद्यात शोल्डर लेनवर उभ्या असलेल्या ट्रकला एका छोट्या टेम्पोने मागून धडक दिली आणि मागून येणारा टेम्पो अपघातग्रस्त गाड्यांवर आदळला. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसल्याची प्रथमिक माहीती समोर आली आहे. पहाटे साडे तीन चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर (Mumbai-Pune Expressway) सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. या अपघातामध्ये अनेकदा समोरच्या व्यक्तीची चूक असल्याने दुसऱ्या व्यक्तीला त्याचे परिणाम भोगावे लागतात. समृद्धी महामार्गावर देखील अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्याच महिन्यात समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा अपघात झाला होता. या अपघातात तब्बल २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.

समृद्धी महामार्गावर मोठी दुर्घटना; समृद्धी महामार्गावर सर्वात मोठी दुर्घटना

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातानंतर महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना दुर्घटना घडली आहे. पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर मशीनसह क्रेन कोसळून १४ कामगारांचा मृत्यू झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे पुलावर सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT