Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर शहापूरमध्ये मोठा अपघात; निर्माणाधीन पुलावरील ग्रेडर-मशिन कोसळली, अनेक जण दबल्याची माहिती

Samruddhi Mahamarg Accident at Shahapur: समृद्धी महामार्गावर पुन्हा मोठा अपघात झाला आहे. पुलावरील ग्रेडर आणि मशिन कोसळून त्याखाली दबून १५ ते २० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे, अशी प्राथमिक माहिती आहे.
Samruddhi Mahamarg Accident at Shahapur
Samruddhi Mahamarg Accident at ShahapurSAAM TV

फय्याज शेख, शहापूर

Samruddhi Mahamarg Accident at Shahapur: समृद्धी महामार्गावर पुन्हा मोठा अपघात झाला आहे. पुलावरील ग्रेडर आणि मशिन कोसळून त्याखाली दबून १५ ते २० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू आहे. त्यावेळी ही दुर्घटना घडली. मृतांचा आकडा नेमका किती हे कळू शकलेले नाही. (Latest News In Marathi)

Samruddhi Mahamarg Accident at Shahapur
Budhana Bus Accident Updates: समृद्धी महामार्ग बस अपघातानंतर RTO अ‍ॅक्शन मोडमध्ये; पहिलीच मोठी कारवाई

समृद्धी महामार्गावरील (Samruddhi Mahamarg) दुर्घटना आणि अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाहीत. काही दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गावर प्रवासी बसला मोठा अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतला आणि त्यात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या घटनेतून सावरत नाही तोच पुन्हा सोमवार आणि मंगळवारच्या मध्यरात्री उशिरा समृद्धी महामार्गावर शहापूर येथे मोठी दुर्घटना घडली.

Samruddhi Mahamarg Accident at Shahapur
Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्ग 'रोड हिप्नोसिस'मुळे ठरतोय जीवघेणा; अपघात टाळण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला एकदा ऐकाच

समृद्धी महामार्गावर शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाचे काम सुरू आहे. पुलाचे काम सुरू असतानाच अचानक त्यावरील ग्रेडर आणि मशिन खाली कोसळली. या दुर्घटनेत १५ ते २० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, तीन जणांचा मृत्यू झाल्याचे सध्यातरी कळते. अंधार असल्याने ग्रेडर आणि मशिनच्या सांगाड्याखाली नेमके किती जण दबले आहेत किंवा मृतांचा निश्चित आकडा किती आहे, हे सांगता येऊ शकत नाही.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com