Section 144 Applied In Mumbai Till 6 February 2024 Saam Digital
महाराष्ट्र

Section 144 In Mumbai: मुंबईत ६ फेब्रुवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश; काय आहे कारण? जाणून घ्या

Jamav Bandi In Mumbai Till 6 February 2024: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात दादरच्या शिवाजी पार्क येथे जमतात. यावेळी कुठलाही घातपात, किंवा अन्य घटना होऊ नयेत यासाठी मुंबई पोलिसांकडून कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

Sandeep Gawade

Prohibition In Mumbai

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक मोठ्या प्रमाणात दादरच्या शिवाजी पार्क येथे जमतात. यावेळी कुठलाही घातपात, किंवा अन्य घटना होऊ नयेत यासाठी मुंबई पोलिसांकडून कलम १४४ अंतर्गत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. शहरात पाच किंवा त्याहून अधिक लोकांच्या एकत्र येण्यास आणि मिरवणुका काढण्यास ६ फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान मनोज जरांगे यांच्यासह हजारो मराठा कार्यकर्त्यांनी 26 जानेवारीपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याची घोषणा केली असून मुंबईच्या दिशेन येतायेत आहेत.

जरांगे यांनी सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी केली आहे. त्यामुळे गजबजलेल्या मुंबईत मराठा समाजाच्या आंदोलनामुळे शांतता भंग होऊ शकते मालमत्तेची हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी आंदोलन मोर्चे काढण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे. हा आदेश बुधवारपासून लागू झाला असून पुढील 15 दिवस लागू राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी कोणत्याही परिस्थित येणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे प्रशासनानेही आंदोलनाला कोणतीही आडकाठी नसल्याचं म्हटलं आहे. मराठा समाजाचे सुमारे दोन ते अडीच कोटी लोक मुंबईत येणार आहेत. 26 जानेवारीला मराठा समाजातील लोक आपली ताकद दाखवतील, असा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर येथे मोर्चादरम्यान जरंगे यांचे जंगी स्वागत करण्यात आले शिक्रापूरमध्ये जरांगेंसोबत सुमारे 750 वाहनांच्या ताफ्यासह किमान 15,000 कार्यकर्ते होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील बिल्डरकडून फसवणूक; सेवानिवृत्त अधिकाऱ्याने इमारतीवरून उडी मारून आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: मुंबईत 40 पेक्षा अधिक गुन्ह्यांतील फरार आरोपी अंधेरी पोलिसांच्या जाळ्यात

Shrikant Shinde: लोकसभेत खास 'फ्रेंडशिप ग्रुप', श्रीकांत शिंदेंची तरुण सदस्य म्हणून एन्ट्री, नेमकं मिशन काय असणार?

Spruha Joshi: रुपसुंदरा, हिरव्या साडीत खुललं स्पृहा सौंदर्य, फोटो पाहून वेडे व्हाल

मद्यधुंद डॉक्टरची भरधाव कार; चार वाहनांना धडक, गाड्यांचा चेंदामेंदा|VIDEO

SCROLL FOR NEXT