young man drowns in sea at Juhu  saam tv
महाराष्ट्र

Mumbai News : जुहू चौपाटीवर होळी खेळणं जीवावर बेतलं, समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

Mumbai News : धूलिवंदनाचा सण असल्याने मंगळवारी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर शहराच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.

Chandrakant Jagtap

>>संजय गडदे

Mumbai News : मुंबईतील प्रसिद्ध जुहू चौपाटीवर होळी खेळायला जाणे एका तरुणाच्या जीवावार बेतले आहे. धूलिवंदनाच्या निमित्ताने जुहू चौपाटीवर गेलेल्या लोकांपैकी एका तरुणाचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अंधेरी पश्चिमेकडील प्रसिद्ध जुहू समुद्र चौपाटीवर मंगळवारी ही घटना घडली आहे.

धूलिवंदनाचा सण असल्याने मंगळवारी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर शहराच्या कानाकोपऱ्यातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दरम्यान सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास एक 26 वर्षीय तरुण समुद्रात होण्यासाठी गेला. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने तो समुद्रात बुडू लागला. (Latest Marathi News)

घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकांनी तरुणाचा शोध सुरू केला. काही वेळातच बचाव पथकांनी बुडणाऱ्या तरुणाला बाहेर काढले आणि जवळच असलेल्या महापालिकेच्या कुपर रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्या तरुणाला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांनी एडीआर दाखल केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहे. (Mumbai News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पावसाळी अधिवेशन सोडून एकनाथ शिंदेंची दिल्ली वारी; अचानक गृहमंत्र्यांच्या भेटीमागील कारण काय?

Tejashri Pradhan: प्रसिद्ध अभिनेत्री तेजश्री प्रधान किती वर्षाची आहे? वय वाचून थक्क व्हाल

Raw Banana Benefits : पावसाळ्यात कच्च्या केळीची भाजी खाण्याचे 'हे' फायदे तुम्ही वाचलेत का?

CM Fadnavis: संजय गायकवाड यांच्यावर कारवाई होणार की नाही? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Nagpur Shocking : पोहायला पाण्यात उतरले, बाहेर आलेच नाहीत; नागपूरमध्ये एकाच दिवशी ३ मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT