Mumbai News Saam tv
महाराष्ट्र

Mumbai News : एसआरएमध्ये २६ दुय्यम अभियंत्यांचा भार एकाच दुय्यम अभियंत्याच्या खांद्यावर

Rajesh Sonwane

संजय गडदे

मुंबई : मुंबईतील झोपडपट्टी आणि पुनर्विकासातील इमारतींचे पुनविकास करण्यासाठी ३३ (१०) आणि ३३ (११) या (Mumbai) बृहन्मुंबई महापालिका विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत प्रत्येक प्रभागात २ याप्रमाणे एकूण २६ दुय्यम अभियंते काम करत आहेत. (Breaking Marathi News)

मात्र आता या सर्व दुय्यम अभियंत्यांच्या हातातील काम काढून ते एकाच दुय्यम अभियंत्याच्या खांद्यावर सोपवले आहे. तसे पत्र २३ ऑगस्टला झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे सचिव यांनी काढले आहे. मात्र हे करत असताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्या बाबतची चर्चा एसआरए कार्यालयात सुरू झाली आहे. 

एसआरए प्राधिकरणाने केलेला या नवीन नियमांमुळे पूर्व आणि पश्चिम उपनगरात ३३ (१०) आणि ३३ (११) या योजनांवर काम करणाऱ्या सर्व दुय्यम अभियंता आणि सहाय्यक अभियंत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

हे सर्व अभियंते लवकरच सीईओ सतीश लोखंडे यांची भेट घेऊन आपली नाराजी व्यक्त करणार असून संबंधित आदेश देखील रद्द करण्याची मागणी करणार असल्याचे समजते. दरम्यान यापूर्वी देखील १८ सहाय्यक अभियंत्यांचे काम एकाच सहाय्यक अभियंत्यावर सोपवण्यात आले आहे.

एसआरए अंतर्गत ३३ (११) नुसार सध्या मुंबईत २०० पेक्षा अधिक योजना सुरू आहे. या सर्व योजनांचे काम एकाच दुय्यम अभियंत्याच्या हाती सोपवण्यात आले आहे. जर सचिवांनी काढलेला आदेश रद्द झाला तर 26 दुय्यम अभियंत्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे.

सध्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात ३३ (१०) नुसार एकूण चौदाशे प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. यापैकी साडेसहाशे प्रकल्प प्रत्यक्षात सुरू देखील झाले आहेत. तसेच ३३ (११) नुसार एकूण २०० प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून ही दोन्ही मिळून साडेआठशे प्रकल्प सध्या सुरू आहेत.

मात्र या सर्व प्रकल्पांचा भार एक सहाय्यक अभियंता आणि एक दुय्यम अभियंता यांच्यावर सोपवल्यामुळे कामाची गती आणि प्रक्रिया संथ गतीने होऊ शकते. त्यामुळे या सर्व प्रकल्पांच्या कामांचे विभाजन १८ सहाय्यक अभियंते आणि 26 दुय्यम अभियंते यांच्यामध्ये विकेंद्रित होणे गरजेचे असल्याचे एसआरएतील सूत्रांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT