Chandrapur Tadoba Safari: आता अल्पदरात ताडोबात करता येणार जिप्सी सफारी; ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत

Chandrapur News : आता अल्पदरात ताडोबात करता येणार जिप्सी सफारी; ऑक्टोबरपासून पर्यटकांच्या सेवेत
Chandrapur Tadoba Safari
Chandrapur Tadoba SafariSaam tv
Published On

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीसाठी नवे क्रुजर वाहनाची निर्मिती केली गेली आहे. या जिप्सीमधून आता अल्पदरात सफारी करता येणार आहे. (Tajya Batmya)

Chandrapur Tadoba Safari
Automated Weather Stations: गावचा सरपंच सांगणार पावसाचा अंदाज; ७० ग्रामपंचायतीत स्वयंचलीत हवामान केंद्र

सध्याच्या जिप्सीचे दर परवडणारे नसल्याने अनेक पर्यटक बस सारख्या कॅन्टरने सफारी करतात. कॅन्टरमध्ये प्रतिव्यक्ती ५०० रुपये आकारण्यात येत असल्याने आर्थिकदृष्ट्या हे किफायतशीर आहे. मात्र कॅन्टर हे बसच्या आकाराचे असल्याने प्रकल्पाच्या आत चिंचोळ्या रस्त्याची पूर्ण जागा व्यापतात. सोबतच कॅन्टरचा आवाज पण जास्त असल्याने गाडीची चाहुल लागताच प्राणी पळून जातात आणि वन्यप्राणी जवळून पाहता येत नाही. 

Chandrapur Tadoba Safari
Building Collapsed : जळगावात जुनी इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली महिला अडकली, बचावकार्य सुरु

६ नवीन जिप्सी 

आता ताडोबा प्रशासनाने ९ पर्यटक बसू शकतील अशा ६ विशेष जिप्सी विकत घेतल्या आहेत. मुख्य म्हणजे या जिप्सीमध्ये देखील अतिशय कमी दर आकारण्यात येणार आहे. ताडोबा कोर झोनचा पुढील हंगाम म्हणजे १ ऑक्टोबरपासून या जिप्सी पर्यटकांच्या सेवेत रुजू करण्याचा ताडोबा प्रशासनाचा विचार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com