Automated Weather Stations
Automated Weather StationsSaam tv

Automated Weather Stations: गावचा सरपंच सांगणार पावसाचा अंदाज; ७० ग्रामपंचायतीत स्वयंचलीत हवामान केंद्र

Nagpur News : गावचा सरपंच सांगणार पावसाचा अंदाज; ७० ग्रामपंचायतीत स्वयंचलीत हवामान केंद्र
Published on

नागपूर : आता गावातील सरपंच पावसाचा अचूक अंदाज सांगणार आहे. यासाठी नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील ७० मंडळात स्वयंचलीत हवामान केंद्र लावण्यात आले आहेत. ग्रामपंचायत हद्दीत लावलेल्या या स्वयंचलीत हवामान (Weather) केंद्रामुळे त्या गावासह परिसरातील गावांना पावसाचा अचूक अंदाज कळणार आहे. (Latest Marathi News)

Automated Weather Stations
Santosh Bangar News: कावड यात्रेत डीजे वाजवत तलवार फिरवली; शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा

गेल्या काही दिवसांत पावसाचा पॅटर्न बदललाय. एका गावात मुसळाधार पाऊस पडतो, तर चार किलोमीटर अंतरावर कडक उन पडतं. यामुळे आता गावागावात लागलेल्या हवामान केंद्रामुळे त्या गावात (Gram Panchayat) पाऊस पडणार की नाही, याचा अचूक अंदाज येणार आहे. त्यामुळे पावसाअभावी शेतकऱ्यांचे होणारं नुकसान कमी करणं शक्य आहे. 

Automated Weather Stations
Beed Crime News: धक्कादायक! महाराष्ट्रातून ट्रक पास करण्यासाठी हजारो रुपयांची लूट; वाहन चालकाचे पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप

होणारे नुकसान टाळता येईल 

स्कायमेटच्या मुळमहावेध प्रकल्पाअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायत हद्दीत हे स्वयंचलीत हवामान केंद्र लावण्यात आले आहेत. या हवामान केंद्रामुळे ७० ग्रामपंचायतीसह आजूबाजूच्या परिसरातील पावसाचा अंदाज घेता येणार आहे. पावसाच्या अचूक अंदाजासाठी शेतकऱ्यांना होणार मदत होणार असून पेरणीनंतरचं शेतकऱ्यांचं नुकसान कमी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com