मयूर राणे
मुंबई : मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ विक्री करणारी टोळी सक्रिय झाली आहे. बाहेरून नशेचे अंमली पदार्थ आणून त्याची सर्रास विक्री केली होती. अशाच प्रकारे विक्री करणाऱ्या परराज्यातील टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. चुनाभटट्टी परिसरात सदरची कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या टोळीच्या ताब्यातून १० कोटी रूपये किमंतीचा चरस अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे.
मुंबई शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्स व अंमली पदार्थांची विक्री केली जात असते. त्यानुसार चुनाभटट्टी पोलीस ठाण्याचे एटीसी पथक व परिमंडळ ६ विशेष पथक हे पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना एक इसम संशयित रित्या वावरताना दिसला. पोलिसांनी त्याला थांबवून चौकशी केली असता त्याने उडवाउडवीचे उत्तर दिले. यामुळे पोलिसांना संशय अधिक बडवल्याने त्याची तपासणी केली.
दोन किलो चरस आढळले
दरम्यान पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ किलो ९०७ ग्रॅम वजनाचा चरस हा अंमलीपदार्थ आढळून आला. ज्याची किंमत अंदाजे १ कोटी ९० लाख रूपये इतकी आहे. तर मुंबईतून पोलिसांनी रहिम माजिद शेख (वय ३०) याला विविध कायदा अंतर्गत अटक केली आहे. तर त्याची अधिक चौकशी केली असता त्याचे साथीदार गुजरात राज्यात असल्याची माहिती समोर आली.
वलसाडमधून एकजण ताब्यात
दरम्यान गुन्ह्याच्या अधिक तपासात पोलीस पथकाने गुजरात राज्यातील वलसाड याठिकाणा वरून तेथील स्थानिक पोलीसांच्या मदतीने नितीन शांतीलाल टंडेल (वय ३२) याला ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून विक्रीकरीता लपवुन ठेवलेला ८ किलो १४६ ग्रॅम वजनाचे अफगाणी चरस अंदाजे किंमत ८ कोटी १० लाख ४० हजार रूपये किमतीचा अंमलीपदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत पोलिसांनी आतापर्यंत एकुण १० किलो ५३ ग्रॅम चरस किंमत १० कोटी ५३ हजार रूपये जप्त करण्यात आला असून गुन्हयामध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.