Shahada Traffic Issue : शहादा मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी; बेशिस्त पार्किंगमुळे नेहमीचीच समस्या

Nandurbar News : दररोज बसस्थानक परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होत असते. बसस्थानक परिसरात हातगाड्यांवर व्यवसाय करणारे हे मुख्य रस्त्यावर हातगाड्या लावून व्यवसाय करत असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी
Shahada Traffic Issue
Shahada Traffic IssueSaam tv
Published On

सागर निकवाडे 
शहादा (नंदुरबार)
: शहरांमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमच निर्माण होत आला आहे. त्यानुसार शहादा शहरातील गजबजलेल्या बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. सातत्याने होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहन काढताना देखील मोठी कसरत वाहनधारकांना करावी लागत आहे.  

नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या ही डोकेदुखी ठरत आहे. दररोज बसस्थानक परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होत असते. बसस्थानक परिसरात हातगाड्यांवर व्यवसाय करणारे हे मुख्य रस्त्यावर हातगाड्या लावून व्यवसाय करत असल्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होत असते. सकाळी दहा वाजल्यापासून हि समस्या निर्माण होत आहे. यामुळे या रस्त्यावरून जाणे देखील जिकरीचे ठरत आहे. 

Shahada Traffic Issue
Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक

बेशिस्त वाहतूकही ठरतेय डोकेदुखी 

शहादा शहरातील मुख्य भाग असलेल्या बसस्थानक परिसरात लागणाऱ्या हातगाड्या आणि बेशिस्त वाहतुक देखील डोकेदुखी ठरत आहे. दररोजची ही समस्या असून वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना भर उन्हात थांबावे लागते. या मार्गावरून निघताना कधी कधी तर अर्धा ते एक तासाचा कालावधी देखील लागत आहे. पालिका आणि प्रशासनाच्या वतीने उपाययोजना करण्यात आल्या तर यातून मार्ग काढता येऊ शकतो. 

Shahada Traffic Issue
Dharashiv : बांधकाम साहित्य पुरविण्याच्या नावाने गंडा; सव्वादोन कोटी रुपयात फसवणूक, पुणे-मुंबईच्या तीन व्यापाऱ्यांवर गुन्हा

वाहतूक शाखेचे दुर्लक्ष 

वाहनधारक वाहन बेशिस्तपणे रस्त्यावर लावत असल्याने वारंवार वाहतूक कोंडीची समस्या ही वाढत आहेत. मात्र वाहतूक शाखेचे कर्मचारी या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे हा त्रास आता सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. वाहतूक कोंडी होणाऱ्या भागात पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात यावी तसेच पालिकेने या भागातील वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या अतिक्रमण आणि बेशिस्त हातगाड्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com