Washim Water Scarcity : पाण्याचे भीषण संकट, प्रशासनाकडून गावाला ट्रॅकरही मिळेना; डोक्यावर हंडा घेऊन महिलांची जिल्हा परिषदेवर धडक

Washim News : वाशीम जिल्ह्यातील कळंबा बोडके या गावातील महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर होऊनही अद्याप पाणी नाही. प्रशासनाकडून टँकर मंजूर होत नाही
Washim Water Scarcity
Washim Water ScarcitySaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: पाण्याचे भीषण संकट निर्माण झाले असताना प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. परिणामी महिलांना दूरवरून डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. यामुळे मंगरूळपीर तालुक्यातील कळंबा बोडखे गावातील महिलांनी आज भर उन्हात डोक्यावर हंडा घेऊन वाशिमच्या जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत धडकल्या.  

वाशीम जिल्ह्यातील कळंबा बोडके या गावातील महिलांना पाणीटंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे. गावाला पाणीपुरवठा करणारी योजना मंजूर होऊनही अद्याप पाणी मिळत नाही. प्रशासनाकडून टँकर मंजूर होत नाहीत, दिवसभर दोनशे रुपये मजुरी करून २०० लिटर पाणी विकत घेण्यासाठी १०० रुपये मोजावे लागण्याची वेळ कळंबा बोडखे गावातील नागरिकांना आली आहे. हि समस्या अनेक दिवसांपासुन गावात निर्माण झाली आहे. 

Washim Water Scarcity
Melghat Water Crisis : मेळघाटात १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा, चिखलदरा तालुक्यात भयावह स्थिती

प्रशासनाकडून देण्यात आले होते आश्वासन 

वाशिम जिल्हा प्रशासन कळंबा बोडखे वाशियांच्या पाणी समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरले असून गावात २ कोटी ४८ लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन सुध्दा तीन वर्षे लोटली. मात्र, अद्याप पाणी मिळालं नाही. यामुळे उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता, यानंतर देखील गावातील महिलांना ४० दिवसात पाणी देऊ असं अश्वासन देण्यात आले होते. तरी देखील आश्वासनपूर्ती झाली नाही. 

Washim Water Scarcity
Dhule : राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकत्र यावे; मनसेकडून धुळ्यात बॅनरबाजी

तर तीव्र स्वरूपाचे आंदोलन 

आश्वासन दिल्यानंतर देखील गावात पाणी न मिळाल्याने संतप्त गावातील महिलांनी आज जिल्हा परिषदेवर घागर मोर्चा काढला. भर उन्हात डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन महिला जिल्हा परिषदेवर धडकल्या. याठिकाणी वाशिम प्रशासनाला पाण्याची मागणी केली. जर त्वरित पाण्याची उपाययोजना न झाल्यास मोठं आंदोलन उभं करणार असल्याचे या वेळी आंदोलनकर्त्या महिलांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com