express Saam TV
महाराष्ट्र

Railway News: मध्य रेल्वेकडून २६ मार्चपर्यंत मेगाब्लॉक, कोणत्या रेल्वेवर होणार परिणाम? कुठे असणार मेगाब्लॉक

Central Railway block: भुसावळ विभागातील म्हसावद स्थानक येथे यार्ड पुनर्रचना कार्य साठी विशेष ब्लॉक. कोणत्या रेल्वे रद्द करण्यात आले. कोणत्या रेल्वे उशीरा धावणार? वाचा वेळापत्रक सविस्तर.

Bhagyashree Kamble

​मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मार्ग विस्तारीकरण आणि यार्ड पुनर्रचना कार्यासाठी ब्लॉक घेतला जाणार आहे. हा नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक २३ मार्च ते २६ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काहींच्या मार्गात बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी या बदलांची नोंद घ्यावी. असे आवाहन मध्य रेल्वे विभागाने केले आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात मार्गाचे विस्तारीकरण केले जात आहे. त्यामुळे ब्लॉक जाहीर केले आहे. हा नॉन-इंटरलॉकिंग ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक असणार आहे. दरम्यान, भुसावळ विभागाअंतर्गत असलेल्या म्हसावद रेल्वे स्थानक येथे अप लूप लाईन विस्तारीकरण सुरु आहे. तसेच अप लूप लाईन ७१४ मीटर ते ७५६ मीटरपर्यंत विस्तारीकरण, त्याशिवाय गती वाढीकरण यासाठी यार्ड पुनर्रचना काम हाती घेण्यात येत आहे.

त्याच अनुषंगाने अनेक गाड्यांच्या फेऱ्या पुढील २६ मार्चपर्यंत रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेच्या तांत्रिक कामांमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते. एकंदरीत होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मध्य रेल्वे विभागाने केले आहे.

भुसावळ विभागातील म्हसावद स्थानक येथे अप लूप लाईन विस्तारीकरण अप लूप लाईन ७१४ मीटरवरून ७५६ मीटरपर्यंत विस्तार, तसेच गतीवाढीकरण यासाठी यार्ड पुनर्रचना कार्य हाती घेण्यात येत आहे. यासाठी नॉन इंटरलॉकिंग कार्य तसेच ब्लॉक घेण्यात येणार असून, त्याचा काही रेल्वेच्या वाहतुकीवर पुढील प्रमाणे परिणाम होणार आहे.

दिनांक: 23.03.2025 ते 26.03.2025 या कालावधीत खालील प्रमाणे रेल्वे रद्द राहतील:

1) गाडी क्रमांक 11113 देवळाली ते भुसावळ मेमू

2) गाडी क्रमांक 11114 भुसावळ ते देवळाली मेमू

3) गाडी क्रमांक 01212 नाशिक ते बडनेरा मेमू

4) गाडी क्रमांक 01211 बडनेरा ते नाशिक मेमू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतींची निवडी

Kidney Health: किडन्या खराब होऊ नयेत म्हणून आत्ताच जीवनशैलीत करा हे 7 बदल

Khana Saree Design: लग्नात नेसण्यासाठी पाहा या 7 ट्रेंडी आणि बजेटमध्ये असलेले सुंदर खणाच्या साड्या

Night Sweating Causes: रात्री झोपल्यानंतर शरीरातून घाम का येतो?

Couple Ring Designs : 'कपल रिंग'च्या आकर्षक डिझाइन्स, तुमचा रोमँटिक अंदाज पाहून बायको होईल खुश

SCROLL FOR NEXT