Pandharpur Thackeray Group News Saam tv
महाराष्ट्र

Pandharpur Thackeray Group News: पंढरपूरमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का, ३०० पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

Mohol -Pandharpur Assembly Constituency: पंढरपूरचे शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

भरत नागणे

Pandharpur News: ठाकरे गटाला (Thackeray Group) एकापाठोपाठ एक धक्के बसत आहे. राज्यभरातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करत आहेत. असे असताना आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. पंढरपूरमधील ठाकरे गटाचे जवळपास ३०० पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह सरपंच आणि इतर सदस्यांच समावेश आहे. पंढरपूरचे शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

मोहोळ पंढरपूर विधानसभा मतदार संघातील उद्धव ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवत या विधानसभा मतदार संघातील उद्धव ठाकरे गटाच्या सुमारे ३०० प्रमुख पदाधिकार्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. या मतदार संघातील शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या नेतृत्वाखाली या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत वर्षा निवासस्थानी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे ठाकरे गटाला पंढरपूरमध्ये मोठे खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, पक्ष प्रतोद आणि महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या मार्गदर्शनाखाली राजू खरे यांनी मोहोळ पंढरपूर विधानसभा मतदार संघात शिंदे सेनेची ताकद वाढवली आहे. याठिकाणच्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना शिवसेनेमध्ये आणण्यामध्ये त्यांना यश आले आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे आता मोहोळ- पंढरपूर मतदार संघात शिंदे गटाला मोठ बळ मिळाले आहे.

ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशानंतर शिवसेनेचे नेते राजू खरे यांच्या पाठीवर थाप टाकत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मोहोळ -पंढरपूर मतदार संघातील राजकीय परिस्थितीवर देखील चर्चा केली असल्याचे सांगितले जात आहे. या मतदार संघातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागावे असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

SCROLL FOR NEXT