Samruddhi Mahamarg Saam Tv
महाराष्ट्र

Samruddhi Mahamarg Toll: मुंबई ते नागपूर, 'समृद्धी'वर १ एप्रिलपासून 'टोलधाड'; महामार्गावरील प्रवास स्वस्त की रेल्वे प्रवास, वाचा सविस्तर

Mumbai To Nagpur Travel: समृद्धी महामार्गावरील प्रवास येत्या १ एप्रिलपासून महागणार आहे कारण टोलच्या दरात वाढ झाली आहे. अशामध्ये मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गावरील प्रवास स्वस्त की रेल्वे प्रवास स्वस्त हे घ्या जाणून...

Priya More

समृद्धी महामार्गावरील प्रवास १ एप्रिलपासून महागणार आहे. समृद्धी महामार्गावरील टोल दरात वाढ करण्यात आली आहे. टोलसाठी १९ टक्क्यांपेक्षा अधिक पैसे मोजावे लागणार आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून प्रवास करताना सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. टोल दरात वाढ झाल्यामुळे समृद्धी महामार्गावरील प्रवासापेक्षा रेल्वे प्रवासच प्रवाशांना परवडणार आहे. कारण रेल्वे प्रवास खूपच स्वस्त असणार आहे. समृद्धी महामार्गावर टोलसाठी किती पैसे मोजावे लागणार आणि रेल्वे प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार हे आपण जाणून घेणार आहोत...

७०१ किलोमीटरचा महामार्ग -

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग हा ७०१ किलोमीटर इतका आहे. पण सध्या नागपूर ते इगतपुरीपर्यंत म्हणजे ६२५ किलोमीटरपर्यंतचा महामार्ग सध्या सुरू आहे. येत्या महिनाभरामध्ये इगतपुरी ते आमने हा उर्वरित ७६ किलोमीटरचा मार्ग सेवेत दाखल होणार आहे. हा संपूर्ण समृद्धी महामार्ग सुरू होण्यापूर्वीच एमएसआरडीसीने टोल दरामध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गचा प्रवास हा खूपच महाग होणार आहे.

२०२८ पर्यंत नवे दर लागू -

येत्या १ एप्रिलपासून समृद्धी महामार्गावर नवे टोलदर लागू होणार आहेत. पुढील तीन वर्षांसाठी म्हणजेच ३१ मार्च २०२८ पर्यंत ते दर लागू राहणार आहेत. नागपूर ते इगतपुरीपर्यंत कार आणि हलकी वाहने यांना सध्या १०८० रुपयांचा टोल भरावा लागतो. मात्र नव्या दरानुसार १,२९० रुपये टोल द्यावा लागेल.

टोलदर वाढीमुळे प्रवासी नाराज -

नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा वेगवान आणि सुरक्षित प्रवासासाठी तयार करण्यात आला आहे. या महामार्गामुळे मुंबईवरून नागपूरला जाणं आणि नागपूरवरून मुंबईला येणं खूपच सोपं होणार आहे. यामुळे प्रवास जलद होईल आणि प्रवासाचा कालावधी देखील वाचणार आहे. पण टोलदरवाढीमुळे प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. आधीच इंधन दरवाढ, गाड्यांची देखभाल यासाठी नागरिकांना खर्च करावा लागतो. त्यात आता टोल वाढ होणार असल्यामुळे प्रवासाचा खर्च अधिक वाढणार आहे. प्रवाशांनी या टोल दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे.

ट्रेन प्रवासच स्वस्त -

दुसरीकडे समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यापेक्षा नागरिकांना नागपूर ते मुंबई आणि मुंबई ते नागपूर रेल्वे प्रवास करणं अधिक फायदेशीर ठरणार आहे. समृद्धी महामार्गावरून प्रवास करण्यापेक्षा प्रवाशांना ट्रेनचाच प्रवास स्वस्त पडणार आहे कारण ट्रेनचे तिकीट दर हे समृद्धीवरील प्रवासापेक्षा खूपच कमी आहेत. नागपूरसाठी मुंबईवरून अनेक ट्रेन जातात. यामधील ४ महत्वाच्या ट्रेन आहेत. या ट्रेन किती वाजता असतात आणि त्याचे तिकीट दर किती आहेत ते आपण जाणून घेणार आहोत...

गितांजली एक्स्प्रेस -

गितांजली एक्स्प्रेस मुंबईवरून सकाळी ६ वाजता सुटते. या ट्रेनचे स्लिपरचे तिकीट ४६० रुपये आहे. तर एसीचे तिकीट १७१० आहे.

सेवाग्राम एक्स्प्रेस -

सेवाग्राम एक्स्प्रेस दुपारी २.५५ वाजता मुंबईतून सुटते. या ट्रेनचे स्लिपरचे तिकीट ४६० रुपये आहे. तर एसीचे तिकीट १७१० आहे.

विदर्भ एक्स्प्रेस -

विदर्भ एक्स्प्रेस ही ट्रेन रात्री ७.०५ वाजता मुंबईतून सुटते. या ट्रेनचे स्लिपरचे तिकीट ४६० रुपये आहे. तर एसीचे तिकीट १७१० ते २८७५ दरम्यान आहे.

नागपूर दुरांतो एक्स्प्रेस -

नागपूर दुरांतो एक्स्प्रेस रोद संध्याकाळी ७.५५ वाजता मुंबईतून सुटते. या ट्रेनचे स्लिपरचे तिकीट ६८५ रुपये आहे. तर एसीचे तिकीट १८८८ ते ३२६० दरम्यान आहे.

समृद्धी महामार्गावर नागपूर ते मुंबई टोलसाठी किती पैसे मोजावे लागणार?

- हलकी, व्यावसायिक, मिनीबससाठी सध्या १७४५ रुपये टोल द्यावा लागतो. नवीन टोलदर २०७५ झाला आहे.

- बस किंवा दोन आसाचा ट्रकसाठी सध्या ३६५५ रूपये टोल दिला जातो. नवीन दरवाढीनुसार ३६५५ रुपये टोल भरावा लागेल.

- अति अवजड वाहनांना सध्या ६९८० रुपये टोल भरावा लागतो. नव्या दरवाढीनुसार ६९८० रुपये टोल भरावा लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT