Mumbai Metro-3 : आरे ते वरळी ३६ मिनिटांत, तिकिट फक्त ६० रुपये; मुंबई मेट्रो-३ वर मेट्रो या दिवशी धावणार

Are to worli, Mumbai Metro-3 : मुंबई मेट्रोचा दुसरा टप्पा दोन आठवड्यात सुरू होणार आहे. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १० एप्रिल पर्यंत ही मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे. आरे ते वरळी हा प्रवास फक्त ३६ मिनिटांत पूर्ण होणार आहे.
Mumbai Metro: मुंबई मेट्रो-३ चा दुसरा टप्पा कसा असणार? किती आणि कोणती स्थानके? तिकीट किती?
Mumbai MetroSaam Tv
Published On

Mumbai Metro-3 Heading To Worli On April 10 : लवकरच दक्षिण मुंबई मेट्रोच्या नकाशावर येणार आहे. १० एप्रिल रोजी मेट्रो ३ वर आरे ते वरळी यादरम्यान मेट्रो (Mumbai Metro Route) धावणार असल्याचे समोर आलेय. १० एप्रिलपासून मुंबईकरांना गर्दी आणि गोंगाटाशिवाय थेट भुयारी मार्गानं प्रवास करता येणार आहे. आरे ते वरळी (are to worli metro News Update) या प्रवासासाटी फक्त ३६ मिनिटांचा वेळ लागणार आहे, या प्रवासाचे तिकिट फक्त ६० रूपये (are to worli metro ticket Price ) इतके असेल. आरे ते वरळी या मार्गावर मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांना धारावी, सिद्धिविनायक मंदिरासारख्या (Dharavi and Siddhivinayak temple) महत्त्वाच्या ठिकाणांना जाणं सोयीस्कर होणार आहे.

मेट्रो लाइन ३ चं काम अंतिम टप्प्यात आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याला सुरूवात झाली होती. त्यावैळी ही मेट्रो आरे ते बीकेसीपर्यंत (are to BKC) सुरू करण्यात आली. दोन आठवड्यात वरळी नाका स्टेशनपर्यंत (आचार्य अत्रे चौक स्टेशन) मेट्रो सुरू होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली आहे. मेट्रो ३ लाईनवर मेट्रो धावल्यानंतर मुंबईकरांना गर्दी, गोंगाट आणि वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. मेट्रो ३ लाईन ही ३ टप्प्यांमध्ये मुंबईकरांसाठी सुरू होणार आहे. आरे ते बीकेसी, बीकेसी ते वरळी आणि वरळी ते कफ परेड असे ३ टप्प्यात मेट्रो सुरू होणार आहे.

Mumbai Metro: मुंबई मेट्रो-३ चा दुसरा टप्पा कसा असणार? किती आणि कोणती स्थानके? तिकीट किती?
Mumbai Metro 3: आरे ते वरळी प्रवास होणार सुसाट! मेट्रो ३चा दुसरा टप्पा मार्च महिन्यात खुला होणार, तिकीट आणि स्थानके किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

आरे कॉलनी ते बीकेसी (Mumbai Metro-3, Aarey Colony to Bandra-Kurla Complex, BKC) :

मेट्रो ३ मार्गातील पहिला टप्पा ७ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला होत. आरे ते बीकेसी १२.६९ किमी मेट्रो प्रवास सध्या सुसाट सुरू आहे. या मार्गावर बीकेसी, वांद्रे कॉलनी, सांताकृझ, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी १, सहार रोड, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी २, मरोळ नाका, अंधेरी, सीप्झ आणि आरे कॉलनी या स्थानकांचा समावेश असेल.

Mumbai Metro: मुंबई मेट्रो-३ चा दुसरा टप्पा कसा असणार? किती आणि कोणती स्थानके? तिकीट किती?
Mumbai Metro: मुंबई मेट्रो-३ चा दुसरा टप्पा कसा असणार? किती आणि कोणती स्थानके? तिकीट किती?

बीकेसी ते वरळी Mumbai Metro-3, BKC to Worli:

बीकेसी ते वरळी हा दुसरा टप्पा १० एप्रिल रोजी सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यात धारावी, शिदलादेवी मंदीर, दादर, सिद्धिविनायक मंदिर, वरळी आणि आचार्य आत्रे चौक या स्थानकांचा समावेश असेल.

Mumbai Metro: मुंबई मेट्रो-३ चा दुसरा टप्पा कसा असणार? किती आणि कोणती स्थानके? तिकीट किती?
Mumbai Metro Line 3: भुयारी मेट्रोचा ऐतिहासिक टप्पा,अ‍ॅक्वा लाईन लवकरच सेवेत

वरळी ते कफ परेड -Mumbai Metro-3, Mumbai Metro-3, Worli to Cuffe Parade:

मुंबई मेट्रोचा तिसरा टप्पा वरळी ते कफ परेड हा जुलै 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या मार्गावर सायन्स म्युझियम, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, ग्रँट रोड, गिरगाव, काळबादेवी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन, कफ परेड या स्थानकाचा समावेश असेल.

तिकिटाची किंमत किती? Mumbai Metro-3 ticket FARE

आरे कॉलनी ते आचार्य अत्रे चौक (वरळी) या संपूर्ण मार्गाचे एकेरी भाडे फक्त ६० रुपये इतके असेल. तिकिटाची किंमत १ रुपयांपासून सुरू होईल, अंतरानुसार तिकिटाची किंमत ठरवण्यात येणार आहे. आरे ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंतचा प्रवास ३४ मिनिटांत पूर् होणार आहे. तर आरे ते वरळी या प्रवासासाठी ३६ मिनिटांचा वेळ लागणार आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. गर्दीच्या वेळी प्रत्येक ७ मिनिटांला एक मेट्रो धावेल, इतर वेळी प्रत्येक १० मिनिटाला एक मेट्रो धावणार आहे.

उद्घाटन कधी होणार ?

आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑक्टोबर २०२४ रोजी झाले होते. ७ ऑक्टोबरपासून सर्वसामान्यांसाठी हा मार्ग खुला झाला होता. बीकेसी ते वरळी या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन महाराष्ट्र सरकारच्या १०० दिवसांच्या योजनेनुसार होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ डिसेंबर २०२४ रोजी याबाबतची घोषणा केली होती. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही मेट्रो १० एप्रिलच्या आधी सुरू होईल असे सांगितलेय.

बोरिवली किंवा दहिसरहून (Borivli or Dahisar) येणाऱ्या लोकांना या मेट्रोचा सर्वाधिक फायदा होणार आहे. मेट्रो 2A, मेट्रो 7 आणि मेट्रो 1 च्या जोडणीचा वापर करून बीकेसीला पोहोचता येईल आणि तिथून मेट्रो-3 ने वरळीपर्यंत जाता येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com