Monsoon Maharashtra 2026 google
महाराष्ट्र

Monsoon Update : मान्सून अडखळला! संपूर्ण महाराष्ट्र कधी व्यापणार? हवामान तज्ज्ञांनी दिली मोठी अपडेट

Monsoon Maharashtra Update : एल निनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातल्या मान्सूनचा वेग मंदावला आहे. संपूर्ण राज्यात जुलै महिन्यानंतर मान्सून सक्रिय होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Sakshi Sunil Jadhav

उन्हामुळे काही भाग अजुनही हैराण झालाय. देशात मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. गोवा आणि पुढे महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाला सुरुवात झालीये. पण मुंबई- पुण्यात उन्हाचा कडाका पडला आहे. जून महिन्यात दरवर्षी पावसाला सुरुवात होते पण यंदाचा हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज जरा वेगळा आहे. यामध्ये पावसाळा थेट जुलै महिन्यात महाराष्ट्र व्यापणार असं सांगण्यात आलं आहे.

हवामान शास्त्रज्ञ एस.डी. सानप यांनी ही महत्वाची माहिती दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून- मुंबईकर आणि पुणेकर पावसाची वाट पाहत आहेत. कारण कोकण आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. आता पुढे अजून काही दिवस मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे. सध्या प्रशांत महासागरात 'एल निनो'चं संकट घोंगावत असून त्याचा परिणाम मान्सूनवर दिसून येत आहे.

त्यामुळे जुलैनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एल निनो हे एक वादळ आहे. ज्याने वातावरणातली उष्णता मोठ्या प्रमाणात वाढते. एल निनोचे वेगवेगळे टप्पे असतात. त्यात तीव्र, अतितीव्र, सुपर एल निनो असे प्रकार असतात.

यावर्षी राज्यात सरासरीच्या सुमारे ९० टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा कमी पावसाचीही शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे शती, जलसाठे आणि इतर क्षेत्रांवर परिणाम होऊ शकतो. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे. एल निनोचा परिणाम हा मान्सूनवर जुलैनंतर पाहायला मिळेल. त्यामुळे महाराष्ट्रात पावसालाही जुलै महिन्यात सुरुवात होईल असा अंदाज आहे.

दरम्यान, १२ रोजी जूनमध्ये उष्णतेचा उच्चांक गाठला होता. भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार, कुलाबा वेधशाळेमध्ये ३६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली गेली. देशात पावसाला सुरुवात झालीये पण महाराष्ट्रात त्याचा वेग काहीसा मंदावलेला दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Decor Tips : बेडरुम असो किंवा हॉल घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी कोणत्या पडद्यांची निवड कराल?

'ऑक्टोबर हिट'मध्ये महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ, कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस, पाहा व्हिडिओ

Child Nutrition: मुलांचं पोट भरणं पुरेसं नाही, योग्य पोषणही महत्त्वाचं; डॉक्टरांनी सांगितलं पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं?

Maharashtra News Live Update: नाशिकच्या मालेगाव तालुका परिसरात कोसळल्या पावसाच्या सरी

Caste Certificate: कास्ट सर्टिफिकेट काढण्यासाठी किती खर्च येतो?

SCROLL FOR NEXT