PM Kisan Yojana: १८ जूनला ₹२००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार? पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

PM Kisan 23rd installment Date: तुम्ही शेतकरी असाल आणि पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर पुढील माहिती तुमच्यासाठी महत्वाची आहे. पीएम किसान योजनेचा पुढच्या हप्ताबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.
PM Kisan 23rd Installment Date
PM Kisan Yojanagoogle
Published On

PM Kisan 23rd Installment Date:  पीएम किसान योजनेचा लाभ हा लाखो शेतकरी घेत आहेत. आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर एकूण २३ हप्ते पाठवण्यात आले आहेत. सोशल मीडियावर यासंदर्भात चर्चा सुरु आहेत. त्यांच्या मते, काहीच दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये येणार आहेत. चला पुढील माहितीत याबद्दल महत्वाची अपडेट जाणून घेऊयात.

पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता कधी येणार?

जे पात्र शेतकरी आहेत, त्यांना पीएम किसान शेतकरी योजनेचा हप्ता हा १८ जून रोजी येण्याची शक्यता आहे. अद्याप सरकारकडून कोणतीही तारिख जाहीर केली गेली नाहीये. पण मागच्या काही हप्त्यांचा अंदाज घेता जुन- जुलै दरम्यान शेतकऱ्यांना हप्ता दिला जातो.

PM Kisan 23rd Installment Date
8th Pay Commission: सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; जुलैमध्ये DA 63% होणार? पगार वाढीचे संकेत

१८ जूनला शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार का?

२०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम किसान सम्मान निधी योजनेचा १७ हप्ता १८ जूनला घोषित केला होता. तेव्हा अंदाजे ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला गेला होता. याचं कारणामुळे असा अंदाज लावला जातोय की, या वर्षीचा २३ वा हप्ता हा १८ जून रोजी येईल. पण अजुनही सरकारने याची अधिकृत घोषणा केलेली नाही.

पीएम किसान योजनेचा हप्ता

शेतकऱ्यांसाठी सरकार नेहमीच मदत करत असतं. आता शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पीएम किसान योजना राबवत आहेत. याअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जातात. यामध्ये वर्षाला एकूण ६ हजार रुपये दिले जातात. ते चार चार महिन्यांच्या अंतराने पाठविले जातात.

PM Kisan 23rd Installment Date
Maharashtra ST Bus: ... तर एसटी बसमधील अर्ध्या तिकीटावरचा प्रवास होणार बंद, आत्ताच करा हे काम

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com