Mumbai LPG Cylinder Price Update in Marathi Saam Digital
महाराष्ट्र

Mumbai LPG Rate Reduced: खूशखबर! LPG गॅसच्या किमतीत मोठी कपात, मुंबईत काय असेल दर, जाणून घ्या

Mumbai LPG Rate Reduced: व्यावसायिक एलपीजीच्या किमतीबाबत एक दिलासादायक बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १९ किलोच्या एलपीजीच्या किंमती ५७. ५ रुपयांनी कमी केल्या आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Mumbai LPG Cylinder Price Update

व्यावसायिक एलपीजीच्या किमतीबाबत एक दिलासादायक बातमी आहे. सरकारी तेल कंपन्यांनी १९ किलोच्या एलपीजीच्या किंमती ५७. ५ रुपयांनी कमी केल्या आहेत. मुंबईमध्ये आजपासून हे दर लागू करण्यात आले असून हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसारख्या छोट्या व्यावसायिकांना दिलासा मिळणार आहे.

दिवाळीच्या काही दिवस आधी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजीच्या किमती १०१.५ रुपयांनी वाढल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा कमी करण्यात आल्या आहेत. घरगुती वापरातील गॅसच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशने मुंबईसह, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या चार महानगरांमध्ये हे नवे दर लागू केले आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

असे असतील नवे दर

मुंबई : १, ७२८

नवी दिल्ली : १७७५.५

कोलकाता : १८८५.५

चेन्नई : १९४२

आगामी काळात लोकसभा, विधासभेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने ऑगस्टमध्ये घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती २०० रुपयांनी कमी केल्या. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ४०० रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र १९ किलोच्या एलपीजीमध्ये दिवाळीपूर्वी वाढ करण्यात आली होती. सध्या १४ किलोच्या सिलिंडरचे मुंबईतील दर ९०२.५० रुपये आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावात शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश, राजकीय वर्तुळात खळबळ

फायनान्स कंपनीच्या कार्यालयात शेतकऱ्याचा मृतदेह, अस्मानी संकटातही बळजबरी वसुली?

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या नाशिक दौऱ्यावर

अमेरिकेचा विक्रम मोडला! नाशिकमध्ये 501 शंखांचा निनाद; थेट गिनीज बुकमध्ये नोंद|VIDEO

Sleep Health : रात्री झोपेत मुलगा वारंवार बेड ओला करतो? पालकांनो, रागवण्यापूर्वी नक्की जाणून घ्या 'ही' ५ मोठी कारणे

SCROLL FOR NEXT