PPF म्हणजेच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Private Provident Fund) ही एक अतिशय लोकप्रिय सरकारी बचत योजना आहे. या योजनेत पैसे (Money) गमावण्याचा धोका नाही. या कारणास्तव, PPF च्या मदतीने, तुम्ही दीर्घकाळात प्रचंड निधी जमा करू शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांच्या नावानेही पीपीएफ खाते उघडू शकता. जाणून घ्या या सरकारी योजनेचे वैशिष्ट्ये -
पीपीएफची खास वैशिष्ट्ये
पीपीएफमध्ये एफडीपेक्षा जास्त व्याज (Interest) आहे. सध्या पीपीएफचा व्याजदर 7.1 टक्के असा आहे.
ही दीर्घकालीन योजना आहे. 15 वर्षांचा लॉक इन कालावधी येथे मिळतो. तुम्ही हे 15 वर्ष 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी वाढवू शकता.
15 वर्षांच्या कालावधीनंतर तुम्ही संपूर्ण पैसे काढू शकता.
PPF ही EEE श्रेणीची योजना आहे. यामध्ये मॅच्युरिटीवर मिळणारी संपूर्ण रक्कम करमुक्त असते.
आयकर (Old Tax Suystem) च्या कलम 80C अंतर्गत PPF मध्ये 1.50 रुपयांपर्यंत कर सूट दिली जाते.
ही सरकारी योजना असल्याने येथे पैसे बुडण्याचा धोका नाही.
त्यावर दरवर्षी व्याज जमा केले जाते.
जर तुम्ही तुमच्या मुलांच्या नावावर पीपीएफ खाते उघडले तर, मुलं 18 वर्षांचे होईपर्यंत हे खाते पालकांच्या नावे असते. मुलांच्या PPF खात्यावर आणि पालकांच्या PPF खात्यावर उपलब्ध असलेली सूट 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
PPF द्वारे 1 कोटी रुपये कसे जमा करायचे
तुम्ही PPF द्वारे 1 कोटी रुपयांचा निधी सहज जमा करू शकता. यासाठी, तुम्हाला दरमहा रु. 12,500 जमा करावे लागतील, म्हणजेच 25 वर्षांसाठी (15+5+5) वर्षाला रु. 1.5 लाख जमा करावे लागतील. या कालावधीत, तुम्ही PPF मध्ये 37,50,000 रुपये जमा कराल आणि तुम्हाला एकूण व्याज मिळेल, म्हणजे रु. 65,58,015 चा फायदा. अशा प्रकारे तुम्ही 25 वर्षांमध्ये 1,03,08,015 रुपये जमा करू शकाल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.