मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8 वाजता जनतेशी संवाद साधणार, घोषणेकडे महाराष्ट्राचे लक्ष ! Saam Tv
महाराष्ट्र

१५ ऑगस्ट पासून मुंबई लोकल सुरु होणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

आज सायंकाळी ८ वाजता समाजमाध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वपूर्ण मुद्दे मांडले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : आज सायंकाळी ८ वाजता समाजमाध्यमातून महाराष्ट्राशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्वपूर्ण घोषणा केल्या आहेत. यावेळी संवाद साधताना ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात आपण पदार्पण करत आहोत. तत्कालीन जनतेने स्वतंत्र्यप्राप्तीसाठी केलेला संघर्ष वाखानण्याजोगा आहे. स्वातंत्र्यदिनाच्या ८ दिवस आधीच मी तुम्हाला आवाहन करतो कि, कोरोनाचे संकट अद्यापही कमी झालं नसून आपण सर्वांनी मिळून कोरोनाची हि दहशत उलथून टाकली पाहिजे.

हे देखील पहा -

ऑलंम्पिकवीर नीरज चोप्राचं कौतूक :

नीरज चोप्राने ऑलंम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून देशाची मान उंचावल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करत नीरज चोप्राचे अभिनंदन केले.

मुंबई लोकल सुरु करण्याबाबत घोषणा :

मुख्यमंत्री म्हणाले, अनेक नागरिक व प्रवासी संघटनांनी लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी वारंवार विनंती केली आहे. परंतु आपण अद्यापही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून पूर्णपणे सावरलो नाही. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे, व केंद्र सरकारने देखील याबाबत वारंवार इशारा देखील दिला आहे.

मात्र, तरीदेखील महाराष्ट्राचे अर्थचक्र सुरु ठेवण्याकरता काही निकष व निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत असून, ज्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन 14 दिवस पूर्ण झाले असतील अश्या नागरिकांसाठीच आपण 15 ऑगस्ट पासून लोकल प्रवास करता येईल.तसेच, ज्या प्रवाशांकडे स्मार्टफोन आहेत असे प्रवासी मोबाईल ऍपच्या माध्यमातून रेल्वे पास डाऊनलोड करू शकतील व स्मार्टफोन नसणाऱ्या प्रवाशांनी शहरातील महापालिकेची प्रभाग कार्यालये तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवरून फोटो पासेस घ्यावेत. अवैधरित्या, बेकायदेशीररित्या पास प्राप्त करून घेऊ नये व लसींचे दोन डोस घेऊनच प्रवास करावा असे आवाहन देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

नैसर्गिक आपत्तीबाबत :

महाराष्ट्रात दरडी कोसळण्याचे व पूर येण्याचे प्रमाण वाढत आहे. तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग वितळत असून पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. मागील आठवड्यात सिक्कीमचे मुख्यमंत्री भेटायला आले असता, त्यांनी देखील सांगितले कि, सिक्कीममध्येही पूर तसेच दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री संबंधित जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी आपण ११.५० कोटी रुपये निधीची घोषणा केली असून या निधीच्या वाटपाचे काम देखील सुरु झाले आहे. पूरग्रस्त भागात उभारण्यात आलेल्या ३५० निवाराघरामध्ये सुमारे ५० हजार नागरिकांना मदत करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: शाळकरी मुलीवर ५ जणांकडून सामूहिक बलात्कार, शौचासाठी घराबाहेर पडली असता अपहरण; नंतर...

Tea Taste : गोड खाल्यावर चहा अळणी का लागतो? तज्ज्ञांनी सांगितलं गंभीर कारण

Maharashtra Rain Live News: मराठवाड्यात ऑरेंज आणि यलो अलर्ट,नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Trimbakeshwar Jyotirlinga: हर हर महादेव! शेवटच्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी

Crime News : पुणे हादरले! कपडे बदलताना फोटो काढून ब्लॅकमेल, १६ वर्षीय मुलीवर ५ वर्षे लैंगिक अत्याचार

SCROLL FOR NEXT