गाढव पाळणारा शहाणा माणूस; दुधाला दहा हजार रुपयांचा भाव !

घरासमोरच दूध काढुन या ताज्या दुधाची विक्री केली जाते. विशेष म्हणजे या दुधाची किंमत एका लिटरमागे तब्बल दहा हजार रुपये एवढी आहे! दहा मिली दुधासाठी शंभर रुपये मोजावे लागतात.
गाढव पाळणारा शहाणा माणूस; दुधाला दहा हजार रुपयांचा भाव !
गाढव पाळणारा शहाणा माणूस; दुधाला दहा हजार रुपयांचा भाव !कैलास चौधरी
Published On

कैलास चौधरी

उस्मानाबाद : आपण आता पर्यंत पाहिले की ओझे वाहून नेण्यासाठी गाढवांचा वापर केला जातो. अथवा एखाद्या व्यक्तीला कमी लेखून शिवी देण्यासाठी गाढवाच्या नावाचा वापर केला जातो. कालानुरूप यात बदल झाला आणि वजन वाहण्यासाठी वाहनांचा वापर केला जाऊ लागला. मात्र, शिवी देण्यासाठी आणि एखाद्या व्यक्तीला वेडा ठरवण्यासाठी अजूनही गाढवाच्या नावाचा वापर केला जातो.

उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा शहरातील गावठाण मध्ये पाल ठोकून नांदेड जिल्ह्यातील धोत्रे कुटुंबीय राहतात. त्यांच्याकडे तब्बल २० गाढवीनी आहेत आणि हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. गाढवाचे दूध हे लहान मुलांसाठी तसेच दमा व न्यूमोनिया सारखे आजार असणाऱ्या रुग्णांवर गुणकारी मानलं जातं असे धोत्रे कुटुंबीय सांगतात. या गाढविणींचे दूध उमरगा शहरात सध्या भोंगा लावून विकण्यात येत आहे.

हे देखील पहा -

घरासमोरच दूध काढुन या ताज्या दुधाची विक्री केली जाते. विशेष म्हणजे या दुधाची किंमत एका लिटरमागे तब्बल दहा हजार रुपये एवढी आहे! दहा मिली दुधासाठी शंभर रुपये मोजावे लागतात. गाढविणीच्या दुधापासून मिळालेल्या पैशातून हे धोत्रे कुटुंबीय सध्या मालामाल झाले आहेत. वीस लोकांचं कुटुंब या दुधावर सध्या आपला उदरनिर्वाह करत आहे.

गाढविणीच्या दुधामुळे रोग प्रतिकारक शक्ती वाढते या दुधामुळे सर्दी खोकला कफ व न्यूमोनिया हे आजार होत नाहीत. शक्यतो लहान मुलांना असे आजार होऊ नयेत व झाल्यास ते बरे होण्यासाठी गाढविणीच् दूध गुणकारी आहे. कोरोनाकाळात या दुधाला मोठी मागणी असल्याचे लक्ष्मीबाई धोत्रे यांनी सांगितले आहे.

गाढव पाळणारा शहाणा माणूस; दुधाला दहा हजार रुपयांचा भाव !
समता परिषदेकडून ओबीसी जनजागृती शिबीर बीडमध्ये संपन्न

उमरगा शहरात गाढविणीच्या या दुधाची चांगलीच चर्चा आहे. गावकरी हजारो रुपये देऊन हे दूध खरेदी करीत आहेत. सकाळी व संध्याकाळी दूध खरेदीसाठी उमरगेकर अक्षरशः तुटून पडताना दिसतात. या दुधाला उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी मागणी आहे.गाढविणीचे दूध हे लहान मुलांसाठी मातेच्या दुधाइतकंच उपयुक्त आहे. शंभर वर्षांपूर्वीपासून गाढविनीचे दूध गुणकारी म्हणून वापरलं जातं. या दुधामुळे पोटाचे विकार टाळण्यास मदत होते.

व्हिटॅमिन डी ची मात्रा अधिक असल्याने रोग प्रतिकारशक्तीही वाढते. या दुधामुळे त्वचा मऊ मुलायम व तजेलदार होते. त्यामुळे सौंदर्य प्रसाधनामध्ये गाढविणीच्या दुधाचा वापर केला जातो. गाय, म्हैस व शेळीच्या दुधापेक्षा हे दूध सकस असल्याचे डॉक्टर सांगतात. निरोगी आयुष्यासाठी दूध उपयुक्त मानलं जातं. वाघिणीच दूध सगळ्यात सर्वांत सकस मानलं जातं. मात्र गाढविणीच दूध सुध्दा काही कमी नाही हे यावरून स्पष्ट होत आहे, आणि त्यामुळेच तर गाढव पाळणारा शहाणा माणूस म्हणणे काही गैर ठरणार नाही !

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com