Mumbai Local news  saam tv
महाराष्ट्र

Mumbai Local : हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत; ३० मिनिटाने उशिराने वाहतूक

मुंबईतील चाकरमान्यासासाठी मोठं वृत्त समोर येत आहे. हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Navi Mumbai News : मुंबईतील हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी मोठं वृत्त समोर येत आहे. हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नेरूळ स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली झाली आहे. नेरूळ ते सीवूड्स दारावे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्याची माहिती समोर येत आहे. रेल्वे रुळाला तडा गेल्याने वाशी ते पनवेल आणि पनवेल ते वाशी दरम्यान रेल्वे ठप्प झाली होती. मात्र,रेल्वे प्रशासनाने काही कालावधीनंतर हे रुळ दुरुस्तीचं काम पूर्ण केलं आहे. तरीही रेल्वे वाहतूक उशिराने सुरू आहे.

हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलं आहे. नेरूळ ते सीवूड्स दारावे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे गेल्याने अनेक रेल्वे गाड्या रेल्वे स्थानकावर उभ्या आहेत. अर्धा ते चाळीस मिनिटांपासून नेरुळ रेल्वे स्थानकात रेल्वे उभ्या राहिल्याने प्रवाशांसाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

वाशी ते पनवेल आणि पनवेल ते वाशी दरम्यान रेल्वे ठप्प झाल्या होत्या. रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने रेल्वे स्थानकावर प्रवासी खोळंबले होते. मात्र, काही कालावधीनंतर हे रुळ दुरुस्तीचं काम पूर्ण केल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्याने सीएसटी, वडाळा, पनवेल लोकल ट्रेन सुरळीत चालू झाल्या आहेत. लोकल ट्रेन सुरळीत सुरू झाल्या असल्या तरी रेल्वे वाहतूक ३० मिनिटाने उशिराने सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara News : डॉक्टर महिला बीडची असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तक्रारी डावलल्या? माजी मंत्री धनंजय मुंडेंचा गंभीर आरोप

Doctor Death Case Satara: ही आत्महत्या नाही… व्यवस्थेने केलेला खून! फलटणच्या डॉक्टर मृत्यूचं गूढ वाढतंय|VIDEO

Maharashtra Live News Update: अमित शहा सोमवारी मुंबईत दौऱ्यावर

टेस्लाच्या स्क्रीनवर दिसतात भुतं? टेस्लामध्ये खरंच रात्री भुतं दिसतात?

Heart Attack: कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तींना सर्वाधिक हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते? अभ्यासातून धक्कादायक बाब उघड

SCROLL FOR NEXT