Ganeshotsav 2022 : गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्यांसाठी खुशखबर; भाजपने केली मोठी घोषणा

भाजपाकडून ५०० बसेस कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत.
Ganeshotsav 2022 BJP 500 MSRTC Buses
Ganeshotsav 2022 BJP 500 MSRTC BusesSaam TV
Published On

मुंबई : गणेशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई भाजपाकडून ५०० बसेस कोकणात रवाना करण्यात आल्या आहेत. अंधेरी येथून आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्या उपस्थितीत ३० बसेस रवाना झाल्या. विशेष बाब म्हणजे या बसमधून तब्बल २० हजाराहून अधिक प्रवाशांना मोफत प्रवास करता येणार आहे. अशी घोषणा भाजपकडून करण्यात आली. (Toll Free Pass For Ganpati 2022)

Ganeshotsav 2022 BJP 500 MSRTC Buses
Rohit Pawar : आमदार रोहित पवारांच्या अडचणी वाढणार?; ग्रीन एकर कंपनीची ED कडून चौकशी

गेली दोन वर्ष कोरोनाचं संकट असल्याने मुंबईतून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांना नेहमीप्रमाणे गणेशोत्सव साजरा करता आला नाही. मात्र, यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. त्यासाठी अनेक कोकणवासी गावी जाणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी मुंबई भाजपाच्या वतीने ५०० बसेस शनिवारी कोकणात रवाना झाल्या. अंधेरी येथून आमदार रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत ३० बसेस रवाना झाल्या. (Ganapati Festival 2022)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून भाजपाचे माजी मुंबई अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या प्रयत्नांतून या उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार अतुल भातखळकर, आमदार नितेश राणे, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेता आमदार प्रविण दरेकर, आमदार प्रसाद लाड, महामंत्री संजय उपाध्याय यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com