Vande Bharat  Saam tv
महाराष्ट्र

Vande Bharat : कोल्हापूरकरांना खुशखबर! मुंबईहून धावणार वंदे भारत, वाचा कधीपासून पटरीवर येणार

New Vande Bharat train for Mumbai-Kolhapur route. : कोल्हापूर आणि मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नवीन वंदे भारत रेल्वे लवकरच धावणार आहे. येत्या पंधरा दिवसांत ही मिनी वंदे भारत गाडी सुरू होण्याची शक्यता आहे. या गाडीमुळे कोल्हापूर-मुंबई प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे.

Namdeo Kumbhar

Kolhapur Mumbai Vande Bharat Train : मुंबई ते कोल्हापूर असा प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई या दरम्यान नवीन वंदे भारत रेल्वे धावणार आहे. क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत मागणी करण्यात आली होती. या मागणीला रेल्वेकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. येत्या पंधरा दिवसांत (When will Vande Bharat train start from Kolhapur to Mumbai? ) ही रेल्वे टर्मिनसवरून धावण्यास सुरू होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर ते मुंबई यादरम्यान प्रवास कऱणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, पण प्रवासासाठी रेल्वेच नाहीत, त्यामुळे अनेकांना त्रास होतो. सध्या पुणे-कोल्हापूर अशी वंदे भारत ट्रेन धावतेय.

पुणे-कोल्हापूर वंदे भारत - New Vande Bharat Express schedule for Mumbai-Kolhapur route

सध्या कोल्हापूरहून पुण्यासाठी वंदे भारत रेल्वे धावत आहे. या गाडीचे उद्घाटन १६ सप्टेंबर २०२४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाले होते. ही मिनी वंदे भारत २.० प्रकारातील रेल्वे आहे. सोमवार, गुरुवार आणि शनिवार अशी आठवड्यातून तीन दिवस धावते. यात आठ डबे असून, एसी चेअर कार आणि एसी एक्झिक्युटिव्ह चेअर कारचा समावेश आहे. मात्र, ही गाडी फक्त पुण्यापर्यंतच धावत असल्याने व्यापारी, नोकरदार आणि प्रवाशांकडून ती मुंबईपर्यंत नेण्याची मागणी सातत्याने होत होती. याला आता यश मिळाले आहे.

पुणे-कोल्हापूर वंदे भारत कधीपासून धावणार - Indian Railways launches new Vande Bharat for Kolhapur passengers

रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी बैठकीत कोल्हापूर-मुंबई वंदे भारत रेल्वेची मागणी पुन्हा लावून धरली. त्यांनी ही गाडी सकाळी मुंबईला सोडावी, असेही सुचवले. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून, खासदार धनंजय महाडिक यांनीही यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, ही रेल्वे मंजूर झाली आहे. नवीन वंदे भारत रेल्वेला आठ डबे असणार असून, ती ५५० प्रवाशांना वाहून नेईल. बियाणी म्हणाले, “ही रेल्वे थेट मुंबईपर्यंत धावेल. लवकरच तिचे वेळापत्रक जाहीर होईल.” या रेल्वेमुळे कोल्हापूर आणि मुंबई दरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि आरामदायी होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

Yavatmal News : बायकोसोबत शेतात गेले, 'मी नंतर येतो' सांगून रानातच थांबले; बातमी आली की...

Akash Deep : आकाश दीपने इंग्लंडमध्ये 'पंजा' खोलला, पाचव्या विकेटनंतर मैदानावरच रडू कोसळलं

SCROLL FOR NEXT