Landslide On Kasara Local Train  Saamtv
महाराष्ट्र

Mumbai Local Train: मुंबई-कसारा लोकल ट्रेनवर दरड कोसळली; दोन प्रवासी जखमी

Landslide On Kasara Local Train : मुंबईहुन कसाराच्या दिशेने येणाऱ्या लोकलवर दरड कोसळल्याची घटना घडलीय. यात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.

Bharat Jadhav

मुंबईहुन कसाराच्या दिशेने येणाऱ्या लोकलवर दरड कोसळल्याने दोन प्रवासी जखमी झाले आहेत. मुंबईहून कसाराकडे येणारी लोकल ही कसारा रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याअगोदर एका क्राॉसिंगहुन स्टेशनला येत असताना ट्रॅक लगत असलेली दरड अचानक कोसळली. दरवाजात उभ्या असलेल्या दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली. या प्रवाशाना रूग्णालयाला पाठविण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारापर्यंत अनेक लोकल रेल्वे धावत असतात. पहिली लोकल ट्रेन ही सकाळी चार वाजेपासून सुरू होते. रात्री एक वाजता शेवटची ट्रेन मुंबईहून कसाराकडे जाते. या मुंबई-कसारा मार्गावर लोकल, फास्ट आणि सुपरफास्ट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लोकल ट्रेन धावतात.

मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा फटका लोकल ट्रेनच्या वाहतुकीला बसत असतो. सध्या लोकल ट्रेनच्या वेळापत्रकावर काही परिणाम झाला नाहीये. पण कसाऱ्याला जाणाऱ्या ट्रेनवर दरड कोसळल्याची घटना घडलीय. दरड कोसळल्याने दोन प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

घटना ही रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. लोकल ट्रेन मुंबईहून कसाऱ्याला जात होती. ट्रेन कसारा रेल्वे स्थानकाजवळ पोहोचत होती. त्याचवेळी रेल्वे स्थानकाजवळ येण्याआधीच एका टेकडीवरची दरड लोकल ट्रेनवर घसरली. यामुळे लोकल ट्रेनच्या दरवाज्यावर उभे असलेले दोन प्रवासी जखमी झालेत. यापैकी एका प्रवाशाच्या पायाला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याची माहिती हाती आलीय. मोठे दगड आणि माती लोकल ट्रेनवर पडल्याचं दिसत आहे.

या घटनेनंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, यासाठी उपाययोजना केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आज वाशिम बाजार समिती राहणार बंद, अडत्यांचे पैसे व्यापाऱ्यांकडे थकले

Government Employees: मोदी सरकारचा मोठा निर्णय! आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणार ३० दिवसांची भरपगारी सुट्टी

Kitchen Tips: फ्रिजची गरजच नाही! पावसाळ्यात भाज्या ताज्या ठेवण्यासाठी 'या' स्मार्ट टिप्स वापरा

Buldhana: शेतामध्ये गेले पण परत आलेच नाहीत, शेतकरी पती-पत्नीची आत्महत्या; बुलडाण्यात खळबळ

Ladki Bahin Yojana: लाडकीला रक्षाबंधनच्या दिवशी गिफ्ट मिळणार, खात्यात ₹१५०० जमा होणार

SCROLL FOR NEXT