सचिन कदम, साम प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या 14 वार्षांपासून रखडलेले आहे. कोकणच्या विकासाचा मार्ग म्हणून पाहिला जाणाऱ्या या रस्त्याचे काम बहूतांशी पूर्ण झाले असले तरी महामार्गावरील उड्डाणपुलांची काम अर्धवट तर बायपासची काम पुर्णपणे ठप्प आहेत. यामुळे मुंबई-गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होईल याची प्रतिक्षा नागरिकांना आहे.
माणगाव आणि इंदापूर शहरातील बाजारपेठ आणि अरुंद रस्ता तर चौपदरीकरणामुळे बाजारपेठेचे होणारे विस्थापन हा मुद्दा लक्षात घेऊन इंदापुर आणि माणगाव या ठिकाणी बायपास रस्ता तयार करण्याचे नियोजित आहे. पण येथील काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून पूर्णपणे ठप्प आहे. तर कोलाड आणि लोणेरे, नागोठणे येथील उड्डाण पुलांची कामे धिम्या गतीने सुरू आहेत. यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत असून येथील स्थानिक नागरीक, व्यापारी, प्रवासी आणि पर्यटक यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय.
मुंबई नागपूरला जोडणारा ५५ हजार कोटींचा ७०१ किलोमीटर लांबीचा समृध्दी महामार्ग ६ वर्षात तयार झाला. पण पळस्पे ते झाराप हा ४३७ किलोमीटरचा मुंबई गोवा महामार्ग १४ वर्षानंतरही पूर्ण होऊ शकलेला नाही. समृध्दी महामार्ग जर ६ वर्षात पूर्ण होत असेल तर मुंबई गोवा महामार्गाला तेरा वर्ष का लागतात असा प्रश्न कोकणवासियांना पडलाय.
रायगड जिल्ह्यात कासू ते इंदापूर आणि इंदापूर ते लोणेरे या टप्प्यातील कामे रखडली आहेत. इंदापूर आणि माणगावच्या बाह्यवळण रस्त्यांचे काम ठप्प आहे. २०१६ मध्ये बाह्यवळण साठी मंजूरी मिळाली आठ वर्षांनंतरही हि दोन्ही बाह्यवळणे रखडलेल्या अवस्थेत असल्याने माणगाव व इंदापूर शहरात मोठी वाहतूक कोंडी होते
कोलाड आणि लोणेरे येथील उड्डाण पुलांची कामे धिम्या गतीने सुरू आहेत. तर नागोठणे भागातील उड्डाणपूलांची कामे वर्षानुवर्ष रखडलेत त्यामुळे दोन्ही बाजू कडील रस्ता खराब झाला असून वाहतूकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. मागील चौदा वर्षांपासून रखडलेल्या कामाचा सर्वाधिक फटका प्रवाशांना तसेच स्थानिकांना बसत आहे.
मोटारसायकलस्वारांना तर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय नियमित होणारे अपघात यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे अपघातांमुळे कित्येकजणांना कायमचे अपंगत्व आलय कंटाळलेले नागरिक काय म्हणताहेत ते ऐका त्यांच्याच शब्दात समृध्दीसारखा साडपाचशे किलोमीटरचा महामार्ग सहा वर्षात पुर्ण होऊ शकतो. मग मुंबई गोवा महामार्गाला तेरा वर्ष का लागतात याचे उत्तर काही मिळत नाही. द
देशात प्रतिदिन ३७ किलोमीटर लांबीचे महामार्ग बनवण्याचा विक्रम राष्ट्रीय महामार्ग विभागाने केला आहे. पण त्याच विभागाला मुंबई गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर हा ८४ किलोमीटरचा लांबिचा मार्ग १३ वर्षात पुर्ण करता आलेला नाही. इंदापूर ते राजापूर मार्गाची परिस्थिती फारशी फारशी वेगळी नाही. हे काम २०१४ साली सरू होऊन २०१६ साली पुर्ण होणे अपेक्षित होते. दहा वर्षानंतरही हे काम पुर्ण झाले नाही. कामातील दिरंगाईमुळे रस्त्याचा खर्च मात्र वाढत चालला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.