Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा १५ दिवसांसाठी बंद, 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर

Kashedi Tunnel Closed For 15 Days: रत्नागिरीमधील कशेडी बोगदा पुढच्या १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने बोगदा बंद राहणार आहे.
Mumbai-Goa Highway
Kashedi Tunnel Closed For 15 DaysSaam Tv
Published On

अमोल कलये, रत्नागिरी

मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रत्नागिरीमधील कशेडी बोगदा पुढच्या १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे. पुलाच्या गर्डर शिफ्टिंगचे काम सुरू असल्याने हा बोगदा वाहतुकीसाठी तात्पुरत्या स्वरूपात १५ दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे मुंबईहून गोव्याकडे जाणारी आणि गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक कशेडी घाट मार्गे वळविण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने ही माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. पोलादपुरजवळ भोगाव याठिकाणी पुलावर गर्डर टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बोगद्यातून होणारी वाहतूक थांबवण्यात आली आहे. हा बोगदा मागील वर्षी गणपतीत वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता.

Mumbai-Goa Highway
Ratnagiri Exit Poll: रत्नागिरी मतदारसंघातून उदय सामंत होणार आमदार? पाहा Exit Poll

कशेडी बोगद्यातून वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे ही वाहतूक सध्या जुन्या घाट मार्गावरून वळवण्यात आली आहे. जुन्या घाट मार्गावरून वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे महामार्ग पोलिसांनी सांगितलं. कशेडी बोगदा बंद करण्यात आल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्ग पाहूनच प्रवास करावा.

Mumbai-Goa Highway
Ratnagiri News: रत्नागिरीतून १३ बांगलादेशींना पोलिसांनी घेतलं ताब्यात, कोकणात कसे पोहचले?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com