Pune Ganesh Visarjan: गणपती विसर्जनाला गालबोट! पुण्यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू

Youth Death During Pune Ganpati Visarjan: तिघांपैकी लक्ष्मी रोड, टिळक रोड व एकाचा कसबा गणपती मंडळाजवळ मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तिनही तरुणांचे मृतदेहांचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन केले असून काही काळामध्ये त्याचा अहवाल येणार आहे.
Pune Ganesh Visarjan: गणपती विसर्जनाला गालबोट! पुण्यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू
Pune Ganesh Visarjan Saam tv
Published On

अक्षय बडवे, पुणे|ता. १९ सप्टेंबर

Pune Ganpati Visarjan 2024: दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर मंगळवारी (ता. १७ सप्टेंबर) लाडक्या गणरायाने निरोप घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणपती विसर्जन सोहळा भक्तीमय वातावरणात, मोठ्या जल्लोषात पार पडला. या गणेशोत्सवात काही ठिकाणी विसर्जन करतेवेळी बुडून मृत्यू झाल्यात्या दुर्दैवी घटनाही घडल्या होत्या. अशातच पुण्यामध्ये गणपती विसर्जन सोहळ्यादरम्यान तीन तरुणांचा आकस्मित मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ससून रुग्णालयाने याबाबतची माहिती दिली आहे.

Pune Ganesh Visarjan: गणपती विसर्जनाला गालबोट! पुण्यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू
Maharashtra Politics : अजितदादांचं ठरलं! ७० हून अधिक जागांवर दावा, विद्यमान आमदारांनाही मोठा दिलासा!

विसर्जन मिरवणुकीत ३ जणांचा मृत्यू

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील विसर्जन मिरवणुकीवेळी तिघांचा आकस्मित मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नयन ढोके, विशाल बल्लाळ, व अन्य एक 45 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून ससून रुग्णालय प्रशासनाने याबाबतची मााहिती दिली आहे. या प्रकाराने शहरात खळबळ उडाली असून हा नेमका मृत्यू कशामुळे झाला? हे शवविच्छेदन अहवालातून समोर येणार आहे.

ससून रुग्णालयाची माहिती..

या तिघांपैकी लक्ष्मी रोड, टिळक रोड व एकाचा कसबा गणपती मंडळाजवळ मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तिनही तरुणांचे मृतदेहांचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन केले असून काही काळामध्ये त्याचा अहवाल येणार आहे. दरम्यान, परभणीमध्येही विसर्जन मिरवणुकीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. विसर्जन मिरवणुकीवेळी डी.जेच्या समोर डान्स करत असतानाच संदिप कदम खाली कोसळला. घटनेनंतर त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले मात्र त्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता.

Pune Ganesh Visarjan: गणपती विसर्जनाला गालबोट! पुण्यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू
Wada Crime News : इंस्टाग्रामवरुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणाला अटक

यंदा डी.जेचा आवाज कमी...

दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत डी.जेच्या आवाजामुळे हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याच्याही घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे पुण्यामध्ये डी.जे आवाजावर मर्यादा ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनाने दिले होते. तसेचसी ई ओ पी तंत्रज्ञान विद्यापीठातर्फे लक्ष्मी रोड वरील १० चौकात ध्वनी पातळीची नोंदही घेण्यात आली. या नोंदीनुसार, पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत डी जे चा दणदणाट पाहायला मिळाला मात्र कमी आवाजाची नोंद झाली आहे.

यंदाच्या मिरवणुकीत ९४.८ डेसिबल इतकी आवाजाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी लक्ष्मी रोडवर १०१.२ डेसिबल इतकी आवाजाची नोंद करण्यात आली होती. विशेष म्हणजे मंगळवारपेक्षा बुधवारी आवजाच्या पातळीत मोठी वाढ झाली असून बेलबाग आणि होळकर चौकात तब्बल ११८.५ डेसिबल पर्यंत आवाज वाढला होता.

गेल्या काही वर्षातील आवाजांची पातळी...

२०२२: १०५.२ डेसिबल

२०२३: १०१.२ डेसिबल

२०२४: ९४.८ डेसिबल

Pune Ganesh Visarjan: गणपती विसर्जनाला गालबोट! पुण्यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू
Eknath Shinde On Sanjay Raut: 'सकाळचे प्रदूषण कमी झालं पाहिजे', CM शिंदेंचा संजय राऊतांना खोचक टोला!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com