Eknath Shinde On Sanjay Raut: 'सकाळचे प्रदूषण कमी झालं पाहिजे', CM शिंदेंचा संजय राऊतांना खोचक टोला!

CM Eknath Shinde Swachhata Seva Abhiyan 2024: गणपती उत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर गिरगाव चौपाटीवर स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालिकेचे जवळपास ५०० कर्मचारी, एनसीसीचे विद्यार्थी, बीच क्लीन अप संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.
Eknath Shinde News: 'सकाळचे प्रदूषण कमी झालं पाहिजे', CM शिंदेंचा संजय राऊतांना खोचक टोला
CM Eknath Shinde and Sanjay RautSaam Tv
Published On

रुपाली बडवे, मुंबई| ता. १९ सप्टेंबर

Mumbai Swachhata Seva Abhiyan 2024: राज्यभरात गणपती विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईमधील गिरगाव चौपाटीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आता गणपती उत्सवाचा कार्यक्रम संपल्यानंतर गिरगाव चौपाटीवर स्वच्छता ही सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पालिकेचे जवळपास ५०० कर्मचारी, एनसीसीचे विद्यार्थी, बीच क्लीन अप संस्थेचे सदस्य यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबईमधील स्वच्छतेबाबतची तयारी सांगत असतानाच विरोधकांवरही निशाणा साधला.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

"स्वच्छता ही सेवा या अभियानाला मी मनापासून शुभेच्छा देतो. पालिकेकडून तर अभियान सुरूच असते. आपण काही ब्लॅक स्पॅाट शोधले आहेत, जिथे कधी कचरा साफ केला जात नव्हता, तिथे देखील आता स्वच्छता केली जाणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी स्वःतच हातात झाडू घेऊन स्वछतेला सुरुवात केली होती. तेव्हा इव्हेंट म्हणून काही लोकांनी टीका केली पण आता तेच काम मोठं झालं आहे. राज्यात या अभियानाच्या माध्यमातून फरक जाणवत आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

संजय राऊतांवर निशाणा..

तसेच "गणपती विसर्जनानंतर जमा झालेले निर्माल्य साफ करण्याच्या सूचना आयुक्तांना दिल्या आहेत. गणेशोत्सव झाला आहे त्यामुळे आता सगळे पोस्टर्स बॅनर काढण्यात यावेत. स्वभाव आणि स्वच्छता यावरही विशेष लक्ष दयायला हवं, आमच्या हित चिंतकांनी सुद्धा स्वच्छता करावी, आपण जे बघतो ना सका सकाळी माध्यमांवर, आम्ही कामातून स्वच्छता करतो असे म्हणत सकाळच होणार प्रदूषण कमी झालं पाहिजे," असा टोला त्यांनी संजय राऊत यांना लगावला.

Eknath Shinde News: 'सकाळचे प्रदूषण कमी झालं पाहिजे', CM शिंदेंचा संजय राऊतांना खोचक टोला
Maharashtra Politics: महाराष्ट्रात येणार महिलाराज? सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे मुख्यमंत्री होणार? गायकवाडांचं वक्तव्य, राजकारण तापलं

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com