Amrit Bharat Express  Saam Tv
महाराष्ट्र

Amrit Bharat Express : मुंबईला मिळाली नवी ट्रेन, तिकिट किती, कुठे जाणार, कुठे कुठे थांबणार?

Mumbai LTT Amrit Bharat Express News update : मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते सहरसा, बिहार दरम्यान पहिली अमृत भारत एक्सप्रेस सुरु; आठवड्यातून एकदा सेवा, थांबे, वेळापत्रक आणि भाड्याची संपूर्ण माहिती वाचा.

Namdeo Kumbhar

Amrit Bharat Express Mumbai To Saharsa News : मुंबईला पहिली अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी बिहारमध्ये या ट्रेनचे उद्घाटन केले होते. मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस ते बिहारमधील सहरसा यादरम्यान ही ट्रेन धावणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून सहरसा आणि परत मुंबईला येणारी अमृत भारत एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेच्या आधुनिक सेवेचा नवा अध्याय आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त, ही रेल्वेगाडी मुंबई ते बिहार दरम्यान जलद आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देते.

मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई ते सहरसा दरम्यान नवीन साप्ताहिक अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्यात येत आहे. सहरसा - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई अमृत भारत एक्स्प्रेस दिनांक २५.०४.२०२५ रोजी मध्य रेल्वेत १६.१५ वाजता खंडवा येथे पोहोचली आहे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे मध्यरात्रीनंतर पोहोचण्याची शक्यता आहे. ट्रेन क्रमांक 11015 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून दिनांक ०२.०५.२०२५ पासून दर शुक्रवारी १२:०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०२:०० वाजता सहरसा येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक 11016 सहरसा दिनांक ०४.०५.२०२५ पासून दर रविवारी ०४:२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५:४५ वाजता पोहोचेल.

अमृत भारत एक्सप्रेस कुठे कुठे थांबणार ?

ठाणे, कल्याण, नाशिक रोड, जळगाव, भुसावळ, इटारसी, जबलपूर, सतना, माणिकपुर, प्रयागराज छिवकी, मिर्जापुर, पं.दीन दयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा, दानापुर, पाटलीपुत्र, सोनपुर, हाजीपुर जंक्शन, मुज़फ्फरपुर, समस्तीपुर, हसनपुर रोड, सलौना आणि खगड़िया जंक्शन

ट्रेनमध्ये किती आणि कोणते डब्बे असतील?

०८ शयनयान क्लास, ११ सामान्य द्वितीय श्रेणी, एक पॅन्ट्री कार आणि ०२ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन

बुकिंग कसं कराल? तिकिट किती ?

सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर बुकिंग सुरू होईल. अतिजलद मेल / एक्सप्रेस ट्रेनसाठी लागू असल्याप्रमाणे सामान्य शुल्कासह अनारक्षित कोचसाठी तिकिटे यूटीएस द्वारे बुक करता येतील. या ट्रेनचे तिकिट ७०० रूपये असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT