Maharashtra 12th Result Date: मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख ठरली, बोर्डाने दिली महत्वाची अपडेट

Maharashtra Board HSC Result 2024 Date Declared: विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची तारीख ठरली आहे.
Maharashtra 12th Result Date: मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख ठरली, बोर्डाने दिली महत्वाची अपडेट
Maharashtra Board Decided Date To Declare 12th Result of Year 2024Saam TV

विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी (ता. २१) दुपारी बारावी परीक्षेचा निकाल जाहीर होणार, अशी माहिती बोर्डाने दिली आहे. विद्यार्थ्यांना १ वाजता ऑनलाइन निकाल पाहता येणार, असंही बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

Maharashtra 12th Result Date: मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख ठरली, बोर्डाने दिली महत्वाची अपडेट
SSC, HSC Result: दहावी-बारावीचा निकाल कधी जाहीर होणार? शिक्षण मंडळाने दिली अत्यंत महत्वाची माहिती

दुसरीकडे दहावीचा निकाल (SSC EXam Result 2024) नेमका कधी लागणार? याबाबत बोर्डाने अद्याप कुठलीही माहिती दिली नाही. दहावी-बारावी परीक्षेचा निकाल लागण्याच्या एक दिवस आधी राज्य मंडळाकडून पत्रक प्रसिद्ध केले जाते. शिक्षण बोर्डाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी दुपारी १ वाजता जाहीर होईल.

त्यामुळे यंदा बारावीचा निकाल (HSC Exam Result 2024) नेमका किती टक्के लागणार? याची आता विद्यार्थ्यांसह पालकांना उत्सुकता लागली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात बारावीची परीक्षा घेण्यात आली होती.

पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील एकूण १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यानंतर निकालाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून होते.

बारावीचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?

  • निकाल ऑनलाइन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना mahresult.nic.in किंवा http://hscresult.mkcl.org या वेबसाइटवर जावे लागले.

  • इथे लॉग इन केल्यानंतर विद्यार्थ्यांनी बारावी निकालावर क्लिक करावे.

  • त्यानंतर तिथे असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाकावा लागेल.

  • तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं (उदा. आईचं नाव Kusum असेल तर तुम्हाला KUS लिहावं लागेल)

  • सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.

  • बारावीच्या निकालाची तुम्ही प्रिंट आऊट घेऊ शकता. याशिवाय तो मोबाइलमध्ये देखील सेव्ह करू शकता.

Maharashtra 12th Result Date: मोठी बातमी! बारावीच्या निकालाची तारीख ठरली, बोर्डाने दिली महत्वाची अपडेट
ICSE Bord Result: आयसीएसईच्या दहावी आणि बारावी परीक्षेचा निकाल जाहीर; कसा आणि कुठे पाहाल? जाणून घ्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com