RBI notice to Bhavani Cooperative Bank for loan defaults Saam TV News
महाराष्ट्र

RBI Action: बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या बँकेवर RBIची कारवाई, ग्राहकांचे पैसे अडकणार? नेमकं कारण काय?

RBI notice to Bhavani Cooperative Bank: भवानी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने ३५ अ अंतर्गत निर्बंध लादले. कर्जवसुली अपयशामुळे ही कारवाई. ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण, संचालक मंडळाची तातडीची बैठक.

Bhagyashree Kamble

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या भवानी सहकारी बँकेच्या अडचणीत वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं या बँकेवर कडक निर्बंध लागू केले असून, नोटीस पाठवून सहा महिन्यांसाठी मर्यादा घालण्यात आली आहे. बँकेकडून दिले गेलेले कर्ज वेळेत वसूल करण्यात अपयश आल्यानं ही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

रिझर्व्ह बँकेनं ४ जुलै रोजी बँकेला बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ च्या कलम ३५ अ (१) आणि कलम ५६ अंतर्गत नोटीस बजावली. या नोटीशीनुसार, बँकेवर पुढील सहा महिन्यांसाठी मर्यादा घालण्यात आली असून, या कालावधीत बँकेतील ग्राहक ठेव काढू शकणार नाहीत. विशिष्ट परिस्थितीत ग्राहकांना थोडी रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे.

ही नोटीस आरबीआयने बँकेच्या संकेतस्थळावर, तसेच शाखांमध्ये प्रदर्शित करण्याचे आदेश देण्यात आले आहे. ठेवीदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिवसैनिकांचा समावेश आहे. यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे. बँक प्रशासनाकडून देण्यात आलेल्या कर्जाची योग्यरित्या वसुली करण्यात न आल्याचा ठपका ठेवत रिझर्व्ह बँकेनं ही कारवाई केली आहे.

या निर्णयानंतर भवानी बँकेच्या संचालक मंडाळाची शनिवारी तातडीची बैठक पार पडली. या बैठकीत रिझर्व्ह बँकेच्या नोटीशीवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, भविष्यात दि. विश्वेश्वर सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bogus Voter Scam: राहुल गांधींकडून पुराव्यांसह बोगस मतदारांचा भांडाफोड; सांगितली नोंदणीची मोडस ऑपरेंडी

Vantara:'माधुरी'नंतर वनताराचा 'गौरी'वर डोळा? गौरी हत्तीणीसाठी 3 कोटींची ऑफर?

Shocking : महाराष्ट्र हादरला! ७ वर्षीय विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून अत्याचार, पालकांमध्ये संताप

Kharadi Rave Party: जावई खेवलकरांच्या मोबाईलमध्ये अश्लील व्हिडिओ फोल्डर, चाकणकरांच्या आरोपांनंतर सासरे खडसेंचा पारा चढला

Gold Found: भारताच्या हृदयात सोन्याची खाण, जबलपूरच्या भूमीत लपलाय 'सोन्याचा खजिना

SCROLL FOR NEXT