Mumbai Chembur Fire:  Saamtv
महाराष्ट्र

Mumbai News : मुंबईत मोठी दुर्घटना, चेंबूरमधील सिद्धार्थ कॉलनीत भीषण आग; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

Mumbai Chembur Fire: शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये एका 7 वर्षीय मुलीचा आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Gangappa Pujari

सूरज मसूरकर, मुंबई

Mumbai Chembur Fire: चेंबुरमधून एक भीषण आगीची घटना समोर आली आहे. चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आगीची घटना घडली. पहाटे 4:30- 5:00 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. इतर नागरिकांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये एका 7 वर्षीय मुलीचा आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

चेंबुरमध्ये अग्नितांडव..

समोर आलेल्या माहितीनुसार, चेंबुरमधील सिद्धार्थ कॉलनीमध्ये आज पहाटे भीषण आग लागली. पहाटे 4:30- 5:00 च्या सुमारास ही भयंकर दुर्घटना घडली. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी अंत झाला. तर परिसरातील काही नागरिकही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. इतर नागरिकांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे.

७ जणांचा दुर्दैवी अंत

पॅरिस गुप्ता (वय, ७ वर्ष), मंजु प्रेम गुप्ता (वय, ३०) अनिता गुप्ता (वय, ३९) प्रेम गुप्ता (वय, ३० वर्ष) नरेंद्र गुप्ता (वय, १० वर्ष), गितादेवी गुप्ता (वय, ६०) अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. मृतांमध्ये एका 7 वर्षीय मुलीचा आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. शॉर्टसर्किट झाल्यामुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यात आली. भीषण आगीमध्ये होरपळून एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

दरम्यान, शिवडीच्या भारत इंडस्ट्रिअल इस्टेटमध्येही आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. इंडस्ट्रिअल एस्टेटच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. याबाबतची माहिती मिळताच १० फायर इंजिन आणि १० पाण्याचे टँकर घटनास्थळी दाखल झालेत. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या दुर्घटनेत कोणीही जखमी किंवा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Poco M7 Plus 5G: पोकोने लाँच केला नवीन स्मार्टफोन; ७०००mAh बॅटरी आणि दमदार फिचर्स, जाणून घ्या किंमत

Coolie vs War 2: रजनीकांतच्या 'कुली' आणि हृतिक रोशनच्या 'वॉर २'मध्ये चढोओढ; तिसऱ्या दिवशी कोणी केली जास्त कमाई

Crime: तरुणाकडून वयोवृद्ध आईवर दोनदा बलात्कार, आधी बेदम मारहाण नंतर...; म्हणाला - 'ही तुझ्या कर्माची शिक्षा'

Tejashree Pradhan: तेजश्री प्रधान मुंबईत कुठे राहते? माहितीये का?

'युतीचं डोक्यातून काढून टाका'; महायुतीत अलबेल नाही? अजित पवार गटाचे खासदार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT