Hingoli Crime : हिंगोलीत फिल्मी स्टाईल थरार; कोट्यवधींच्या खंडणीसाठी वृद्धाचं अपहरण करणाऱ्या 6 जणांच्या आवळल्या मुसक्या

Hingoli Crime News : मराठवाड्याच्या हिंगोलीत 65 वर्षीय व्यापारी आजोबां एक कोटीच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं होतं. पोलिसांनी या प्रकरणातील ६ जणांना अटक केली आहे.
Hingoli Crime
Hingoli CrimeSaam Digital
Published On

मराठवाड्याच्या हिंगोलीत एखाद्या चित्रपटाला लाजवेल असा असा अपहरणाचा थरार घडला आहे., 65 वर्षीय व्यापारी आजोबांकडे खूप पैसे आहेत ही अफवा ऐकून सहा आरोपींनी अपहरण करत एक कोटीच्या खंडणीची मागणी केली होती. मात्र पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळत त्या आजोबांची सुटाक केली असून ६ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन बंदूक, काडतूसे आणि अपहरण केलेलं वाहन जप्त केलं आहे.

मराठवाड्याच्या हिंगोलीत चित्रपटातील एखाद्या सिनेमाला शोभावा असा अपहरणाचा थरार घडला आहे, हिंगोलीच्या आखाडा बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका व्यापारी असलेल्या आजोबांकडे बक्कळ पैसे आहेत आणि त्यांचं अपहरण केलं तर त्यांची मुलं कोट्यवधी रुपये देतील अशी ऐकीव माहिती मिळालेल्या आरोपींनी गणपतराव शिंदे या आजोबांच्या अपहरणाचा डाव रचला. तीन तारखेला सायंकाळी शेतातून घराच्या दिशेने निघालेल्या या आजोबांचं चार चाकी वाहनातून अपहरण केलं .

त्यानंतर आरोपींनी आजोबांच्या मोबाईल वरून मुलांना फोन करून तुमच्या वडिलांना जिवंत पाहायचं असेल तर एक कोटी रुपये द्या म्हणत खंडणीची मागणी केली. वडिलांच्या मोबाईलवरून अचानक अपहरण करणाऱ्या आरोपींचा फोन आल्याने घाबरलेल्या मुलांनी तातडीने बाळापुर पोलीस स्टेशन गाठत अपहरणाच्या याया सगळ्या घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर सुरू झाला आजोबांच्या सुटकेचा प्रवास, या घटनेचे गांभीर्य ओळखत हिंगोलीचे पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी या प्रकरणात पोलिसांची स्वतंत्र पथके स्थापन करत आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या , यासाठी सायबर पोलिसांचे देखील एक विशेष पथक स्थापन करण्यात आलं मात्र अपहरण करणारे आरोपी वेळोवेळी लोकेशन बदलत असल्याने पोलिसांना तपासात अनेक अडथळे येत होते.

Hingoli Crime
Daund Hadapsar Demu Train : डेमू ट्रेन आता पुण्यापर्यंत धावणार, हजारो रेल्वे प्रवाशांना दिलासा

अखेर पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवत सुतावरून स्वर्ग गाठला आणि आरोपींना थेट संभाजीनगर हायवेवरून ताब्यात घेतलं. पोलिसांनी आधी अपहरण झालेल्या आजोबांची सुखरूप सुटका केली आणि त्यानंतर अपहरण करणाऱ्या आरोपींना पोलिसी खाक्या दाखवला. हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात एकून सहा आरोपींना अटक केली असून हे आरोपी कर्नाटक, बीदर या सह नांदेड जिल्ह्यातील आहेत. धक्कादायक म्हणजे या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेले अनेक आरोपी हे अटल गुन्हेगार असून नांदेड पोलिसांना देखील हे आरोपी मिळत नव्हते. दरम्यान हिंगोली पोलिसांनी या आरोपीकडून दोन गावठी पिस्टल काडतूस, अपहरण करण्यासाठी वापरलेले वाहन आयफोन सह महागडे मोबाईल जप्त केले आहेत, अशी माहिती हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.

Hingoli Crime
Rahul Gandhi : संविधानात शिवरायांची विचारधारा! राहुल गांधींनी कोल्हापुरातून महाराष्ट्राला केलं मोठं आवाहन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com