Mumbai Breaking Saam Digital
महाराष्ट्र

Mumbai Breaking : आईस्क्रीममध्ये सापडलेल्या बोटाचा DNA झाला मॅच; नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा Video

Human Finger Found Ice Cream : आईस्क्रिममध्ये सापडलेल्या मानवी बोटाचा डीएनए अहवाल समोर आला आहे. फॉर्च्यून डेअरीमधील असिस्टंट ऑपरेटर ओंकार पोटे यांच्या DNA शी बोटाच्या तुकड्यांचा DNA झाला मॅच झाला

Sandeep Gawade

मुंबईमध्ये एका व्यक्तीने ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रिममध्ये मानवी बोट सापडल्यानंतर एकच खळबळ माजली होती. आता याच बोटाचा DNA अहवाल झाला मॅच झाला आहे. फॉर्च्यून डेअरीमधील असिस्टंट ऑपरेटर ओंकार पोटे यांच्या DNA शी बोटाच्या तुकड्यांचा DNA झाला मॅच झाला असून आईसक्रीमचं पॅकेजिंग करताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

DNA अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे. आईस क्रीमच पॅकिंग करताना अपघातात बोटाचा काही भाग गमावलेला कर्मचारी पोलिसांना सापडला आहे. अपघातात त्याने उजव्या हाताच्या मधल्या बोटाचा वरचा भाग गमावला होता. महिन्याभरापूर्वी त्याचा अपघात झाला होता.

मुंबईतल्या मालाडमधील ब्रँडन फेराओ नावाच्या व्यक्तीने झेप्टो या ऑनलाईन अॅवरून आईस्क्रिम मागवली होती. या आईस्क्रिममध्ये मानवी बोट आढळल्यामुळे त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी ही माहिती मुंबई पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला होता.

मालाड पोलिसांनी याप्रकरणी यम्मो आईस्क्रिमविरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच या मानवी बोटाचे अवशेष फॉरेन्सिंक तपासणीसाठी पाठवले होते. आईसस्क्रिममधलं बोट नेमकं कुणाचं याचा शोध सुरू झाला. गाझियाबादमध्ये तयार झालेली आईस्क्रिम मुंबईत डॉ. फेराओ यांच्या घरापर्यंत कशी पोहोचली, याचा पोलीस कसुन तपास करीत होते. आता त्याचा अहवाल समोर आला असून फॉर्च्यून डेअरीवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठं खिंडार, बड्या नेत्याने हाती घेतलं 'कमळ'

भाजपात इनकमिंगचा धडाका! कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाला धक्का; बड्या नेत्यांची कमळाला साथ

Agricultural Land: तुमची शेतजमीन शेजारच्याकडे जास्त गेलीय? मग जमीन परत कशी मिळवणार?

शिंदे गटाचे माजी मंत्री तानाजी सावंत आणि अजित पवार समर्थकांमध्ये दगडफेक|VIDEO

Maharashtra Live News Update: सोळा वर्षीय भाचीला मामाने ट्रेनमधून ढकललं; अल्पवयीन भाचीचा मृत्यू

SCROLL FOR NEXT