Borivali bogus call center American citizens SaamTV
महाराष्ट्र

Mumbai Crime : कम्प्युटरमध्ये तांत्रिक अडचणी सांगून फसवणूक, मुंबईत बसून अमेरिकन नागरिकांना गंडवलं; मुंबईत खळबळ

Mumbai Crime News : बोगस कॉल सेंटरची माहिती मुंबई गुन्हे शाखा युनिट १२ला मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईमध्ये बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Prashant Patil

मुंबई : संगणकातील मायक्रोसॉफ्ट ॲप्लीकेशनमधील तांत्रिक अडचण दूर करण्याच्या नावाने अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या बोगस टोळीला अटक केली आहे. बोरिवली पश्चिम परिसरात वजीरा नाकाजवळ बोगस कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची फसवणूक केली जात होती. या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना त्यांच्या कम्प्युटरमध्ये काही दुरुस्ती आणि अडचणी आहे का? असा संपर्क साधून त्यांचा बँकेचे डिटेल्स घेऊन त्यांची फसवणूक केली जात होती.

या बोगस कॉल सेंटरची माहिती मुंबई गुन्हे शाखा युनिट १२ला मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून छापा टाकून ही कारवाई केली. या कारवाईमध्ये बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून ६ लॅपटॉप, २० मोबाईल, २ राऊटरसोबत २ लाख ४१ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक केलेल्या आरोपींच्या या टोळीकडून मुंबई शहरात आणखी कुठल्या ठिकाणी बोगस कॉल सेंटर चालवून नागरिकांची फसवणूक केली आहे का? या टोळीमध्ये आणखी कोण सदस्य आहेत का? या संदर्भात मुंबई गुन्हे शाखा युनिट १२ कडून पुढील तपास केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

OBC/Maratha Reservation: हैदराबाद गॅझेट GR विरोधात ओबीसी कोर्टात; मराठा आरक्षणाला आव्हान

Bus Accident: भीषण अपघात! भरधाव बसची टँकरला धडक, ५० फूट खोल दरीत बस पलटली, अनेकजण वाहनाखाली दबले

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान मोदींकडून सरसंघचालकांचं कौतुक; ७५ व्या वाढदिवसामिनित्त दिल्या शुभेच्छा

Fact Check : महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान? सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय?

मराठा विद्यार्थ्यांना SEBC चा फटका? MPSC निकालात कट ऑफ वाढला

SCROLL FOR NEXT