Thackeray brothers during a joint political appearance ahead of the Mumbai BMC elections. saam tv
महाराष्ट्र

Corporation Election: युती झाली पण लढाई सोप्पी नाही; ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजपचा प्लान काय?

Uddhav- Raj Thackeray Yuti: अखेर ठाकरेंची युती झाली. मात्र ठाकरेंसाठी मुंबई महापालिकेची लढाई सोप्पी नसल्याचं म्हटलं जातंय. त्याचं नेमकं कारण काय? भाजपच्या रणनीतीमुळे ठाकरेंना कसा फटका बसू शकतो. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.

Bharat Mohalkar

अखेर ठाकरे बंधूंनी महापालिकेच्या आधी युतीची घोषणा केली. मात्र ही लढाई ठाकरेंसाठी अस्मितेसोबतच अस्तित्वाची असणार आहे.कारण ठाकरेंपुढं भाजपचं तगडं आव्हान असणार आहे. ते कसं. पाहूयात.

2017 मध्ये शिवसेना 84 जागांवर विजयी

भाजप 82 जागांसह दुसऱ्या स्थानी

शिवसेनेचे 75 उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर

मनसेचा 7 नगरसेवक, मात्र 9 जागांवर दुसऱ्या स्थानी

खरंतर 2017 मध्ये शिवसेनेच्या तुलनेत भाजपला फक्त 2 जागा कमी मिळाल्या होत्या. मात्र त्यानंतर शिवसेनेची 2 शकलं झाली. त्यामुळे आधीच विजयापासून 2 पावलं दूर असलेल्या भाजपचं आव्हान असल्यानं ठाकरे बंधूंनी मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र येण्याची घोषणा केली. मात्र मराठी आणि अमराठी मतांमधील फुटीमुळं ठाकरेंचं टेन्शन वाढलंय.

मुंबईत 36 पैकी 13 अमराठी आमदारांचा विजय

भाजपचे 13 पैकी 7 आमदार

2017 मध्ये 227 पैकी 72 अमराठी नगरसेवक निवडून आले होते

त्यात 72 पैकी 36 हे भाजपचे नगरसेवक होते

खरंतर मुंबईत 41 टक्के मराठी, तर 59 टक्के अमराठी भाषिक आहेत. त्यात भाजपकडे 7 अमराठी आमदार आहेत. त्यामुळे भाजपनं अमराठी भाषिकांसोबतच मराठी भाषिकांना साद घातलीय.तर दोन्ही ठाकरे एकत्र आले असले तरी मराठी आणि अमराठी दोघंही ठाकरेंना साथ देणार नसल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय.

खरंतर राज ठाकरेंनी 2005 मध्ये शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. आता दोन्हीही ठाकरे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर एकत्र आलेत. त्यामुळे एकीकडे भाजपचा हिंदूत्व केंद्रीत आक्रमक प्रचार, मुंबईच्या विकासाचं आश्वासन, अमराठी भाषिकांना घातलेली साद तर दुसरीकडे मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका. गटातटात विभागलेला मराठी मतदार अस्मितेच्या मुद्दयावरून ठाकरेंकडे वळला तरी अमराठी मतदारांमुळे मुंबई जिंकण्याचं मोठं आव्हान ठाकरेंसमोर असेल.त्यामुळे मुंबईकर मराठी अस्मितेला दाद देणार की हिंदूत्वाची हाक ऐकणार. हे पाहणं उत्सुकतेच असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Punha Ekda Sade Made Teen: नाताळची खास भेट! ‘कुरळे ब्रदर्स’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'पुन्हा एकदा साडे माडे तीन'ची तारीख जाहीर

Maharashtra Live News Update : सुप्रिया सुळेंचा वंचितच्या शहर अध्यक्षांना फोन...

Student Scholarship: या विद्यार्थ्यांना मिळणार १२००० रुपयांची स्कॉलरशिप; काय आहे योजना?

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे लोणावळ्यात जॅम, ताम्हिणी घाटातही वाहनांच्या रांगा

NPS Rule: कामाची बातमी! NPS च्या नियमात मोठा बदल; ₹५००० महिन्याला गुंतवा अन् ९२ लाख मिळवा

SCROLL FOR NEXT