Mahayuti: नाशिकचा तिढा सुटला, पण पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचं घोडं अडलं, कसा आहे जागावाटपाचा फॉर्म्युला?

Mahayuti Politics: महायुतीने नाशिकच्या जागावाटपाचा प्रश्न सोडवलाय. पण पुण्यातील जागांवरची चर्चा अनिर्णीत राहिलीय. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बैठकीनंतर पुण्यातील जागा वाटपाचा तिढा सुटेल अशी शक्यता आहे. त्यानंतर उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल.
Mahayuti Politics:
Shiv Sena and BJP leaders during marathon talks over Mahayuti seat-sharing for civic elections.saam tv
Published On
Summary
  • महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या बैठकांना वेग

  • नाशिकमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला

  • पुण्यातील जागांवर एकमत न झाल्याने निर्णय प्रलंबित

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली घडत आहेत. ठाकरे बंधूंनी आपल्या पक्षांची युती जाहीर केली. तर दुसरीकडे महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटलाय. नाशिक आणि पुण्यातील जागावाटप संदर्भात आज महायुतीमधील शिवसेना आणि भाजप नेत्यांची आज बैठक झाली. जवळपास ९ ते १० तास दोन्ही पक्षांची बैठक झाली. यात नाशिकमधील तिढा सुटला पण पुण्यातील जागावाटपावर निर्णय होऊ शकला नाही नाहीये. त्या जागांचे प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या दरबारी सोडवले जाणार आहेत.

Mahayuti Politics:
Corporation Elections: ठाकरे बंधूंची युती होताच एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय; शिवसेनेच्या 40 शिलेदारांना दिली मोठी जबाबदारी

नाशिक महापालिकेमध्ये भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहेत. तर शिंदेंची शिवसेना २५ ते ३० जागा लढवणार आहेत. भाजपचा हा प्रस्ताव शिवसेनेला मान्य आहे. नाशिक महापालिकेसंदर्भात जागावाटपावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री दादा भुसे यांच्यात बैठक पार पडली होती.

नाशिकमध्ये शिवसेनेची आधी ४५ जागांची मागणी होती. मात्र भाजपकडून त्यांना 2५ ते ३० जागा सोडण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून तो शिवसेनेला मान्य असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.यामुळे नाशिकमध्ये भाजप महायुतीत मोठा भाऊ असणार आहे.

Mahayuti Politics:
BJP- Shiv Sena Yuti: भाजप- शिवसेनेच्या युतीमध्ये कोण घालतोय खोडा? लवकर निर्णय घ्या नाहीतर...,शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर इशारा

पुण्यातील जागावाटपाचा तिढा कायम

नाशिकच्या जागा वाटपाचा मार्ग मोकळा झाला मात्र पुण्याचा प्रश्न अजून अनुत्तीर्ण आहे. दरम्यान सकाळपासून पुण्यातील हॉटलमध्ये भाजपच्या कोअर कमिटीची बैठक चालू होती. मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री मुरलीधर मोहोळ, सुनील कांबळे, गणेश बिडकर, माधुरी मिसाळ, धीरज घाटे हे या बैठकीला उपस्थित होते. पुण्यात भाजप- शिवसेना युती करणार आहेत मात्र जागेबाबत अजूनही तिढा सुटला नाहीये.

ज्या जागांवर तिढा आहे त्या जागांचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत होणार आहे. ज्या जागांवर एकमत नाही त्या जागांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतरच यादी जाहीर केली जाणार आहे. पुण्यात शिवसेनेला ३०-३५ जागा हव्या असल्याची माहिती मिळतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com