Mumbai Azad Maidan Shiv Sena Uddhav Thackeray Saam Tv News
महाराष्ट्र

हिंदी-मराठीवरून राजकारण तापलं, आझाद मैदानात उद्धव ठाकरेंनी 'जीआर'ची केली होळी; राज्यात राजकीय चटके

Mumbai Azad Maidan Shiv Sena Uddhav Thackeray : मुंबईत हिंदी आणि मराठी भाषेवरून राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) आज रविवारी दुपारी आझाद मैदानावर महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या सरकारी आदेशाच्या (जीआर) प्रती जाळून निषेध केला आहे.

Prashant Patil

मुंबई : मुंबईत हिंदी आणि मराठी भाषेवरून राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) आज रविवारी दुपारी आझाद मैदानावर महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या सरकारी आदेशाच्या (जीआर) प्रती जाळून निषेध केला आहे. या निषेधाचं नेतृत्व स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरेंसह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी 'मुंबई आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची' अशी घोषणाबाजी करण्यात आली.

उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी जाहीर सभा आणि होळीची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज रविवारी आझाद मैदानाजवळ मुंबई मराठी पत्रकार संघ परिसरात ही होळी करण्यात आली आहे. यावेळी हिंदी भाषेच्या निर्णयाच्या शासन आदेशाची होळी केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे स्वतः उपस्थित आहेत. त्यांच्याबरोबर खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहे. मराठी मुद्द्यावरुन ठाकरे बंधू एकत्रित आल्यामुळे मनसेचे नेते व कार्यकर्ते देखील या होळीला उपस्थित आहेत. या राजकीय होळीसाठी मनसेचे नेते नितीन सरदेसाई हे देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं आहे.

यापूर्वी महायुती सरकारकडून शालेय अभ्यासक्रम जाहीर करताना पहिली ते चौथी पर्यंत हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आली होती. याविरोधात मनसे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. राज ठाकरे यांच्या तीव्र विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला. यानंतर आता अनिवार्य शब्द काढून पर्यायी भारतीय भाषा म्हणून राज्य सरकारने हिंदी भाषेचा पर्याय दिला आहे. कोणतीही तिसरी भारतीय भाषा विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे. यामध्ये २० विद्यार्थी असतील तर शिक्षक देखील देण्यात येणार असल्याचे देखील शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितलं आहे. मात्र, वेगळ्या मार्गाने का होईना राज्यात हिंदी सक्ती केली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. यावरुन राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांनी एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT