Mumbai Ahmedabad Highway  Saam TV
महाराष्ट्र

मुंबई- अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही चालक जागीच ठार

याच वाहिनीवर मागच्या दिशेने पाण्याने भरलेला टँकर एम एच ४६ एएफ ३८०५ चालकाचे नियंत्रण सुटल्याने येवून आदळला.

चेतन इंगळे

मुंबई अहमदाबाद महामार्गावर दोन टँकर मध्ये भीषण अपघात झाला असून यात दोन्ही वाहन चालकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर शिरसाड पाडा गावाच्या हद्दीत दुपारी ३ वाजताच्या दरम्यान गुजरात (Gujrat) वाहिनीवर इंडियन ऑईलच्या एम एच ४३ बी पी ६६४० टँकरमध्ये बिघाड झाल्याने चालकाने टँकर रस्त्याच्या कडेला उभा करून दुरुस्ती करण्यासाठी टँकरच्या मागे गेला असताना. याच वाहिनीवर मागच्या दिशेने पाण्याने भरलेला टँकर एम एच ४६ एएफ ३८०५ चालकाचे नियंत्रण सुटल्याने येवून आदळला. (Mumbai Ahmedabad Highway Accident News In Marathi)

या अपघातात दोनही चालकांचा जागीच मृत्यू झाला असून अशोककुमार पाल आणि शिवाधारी यादव अशी चालकांची नावे आहेत. ज्वलनशील रसायन भरलेल्या टँकरला गळती लागली नाही. अन्यथा या अपघातांची भीषणता आणखी भयानक झाली असती. पोलिसांना (Police) माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वाहतूक कोंडी नियंत्रित केली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT