ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनहेल्दी लाइफस्टाइल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो.
केसांना दही लावल्याने कोणते फायदे होतात, जाणून घ्या
आठवड्यातून एक किंवा दोनदा दही लावल्याने कोरड्या आणि निर्जीव केस चमकदार होतात.
दह्यामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड फंगल इन्फेक्शन होण्यापासून रोखते आणि कोंडा देखील कमी करते.
जर तुम्ही नियमितपणे दही वापरत असाल तर केसांची वाढ लवकर होण्यास मदत करते.
उष्णतेने किंवा खाज सुटल्याने त्रासलेल्या स्कॅल्पला दही लावल्याने आराम मिळतो.
दहीमध्ये प्रोटीन असते जे केसांना तुटण्यापासून रोखते आणि केस मजबूत करते.