Accident News saam tv
महाराष्ट्र

Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात! भरधाव टेम्पोने शाळकरी मुलींना उडवलं, चालक मद्यधुंद अवस्थेत

Accident News : नाशिकमध्ये चांदवड जवळ सोग्रसमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात झाला. एका टेम्पोने काही शाळकरी विद्यार्थिंनीना उडवले. जखमी विद्यार्थांनींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Yash Shirke

  • मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात

  • टेम्पोने मारली शाळकरी मुलींना धडक

  • जखमी जवळच्या रुग्णालयात दाखल

  • दादा भुसेंने घेतली जखमी विद्यार्थिंनींची भेट

अभिजीत सोनावणे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Nashik Accident : मुंबई-आग्रा महामार्गावर एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. एका टेम्पोने शाळकरी विद्यार्थिनींना उडवले. या अपघातामध्ये २ ते ३ विद्यार्थिनी गंभीररित्या जखमी झाल्याची प्राथमिक तपासात म्हटले गेले आहे. जखमी शाळकरी विद्यार्थिनींना जवळच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड जवळच्या सोग्रसमध्ये एका टेम्पोने काही शाळकरी मुलींना उडवले. छोट्या पिकअप टेम्पोच्या धडकेमध्ये २ ते ३ शाळकरी मुली जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमी मुलींना चांदवडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

ज्या वेळी टेम्पोचा अपघात झाला, त्याच दरम्यान राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे नाशिक येथून मालेगावच्या दिशेने जात होते. त्यांना या अपघाताची माहिती मिळाली. मालेगावला जात असताना ते चांदवड शासकीय रुग्णालयात जखमी मुलींना पाहण्यासाठी पोहोचेल. त्यांनी मुलींची विचारपूस केली आणि डॉक्टरांची भेट घेऊन उपचाराबाबत सूचना दिल्या.

नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर एका लहान पिकअप टेम्पोने शाळकरी विद्यार्थिंनींना धडक दिली. या अपघातामुळे काही विद्यार्थिनी जखमी झाल्या. पिकअप टेम्पो चालक हा दारु पिऊन टेम्पो चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची दखल राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आरक्षणाचा मुद्द्यावरून राज्यातील आदिवासी आमदार खासदार येणार एकत्र

Masti 4: पार्ट १,२ और ३ को याद करो...; रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि आफताब शिवदासानीची पुन्हा 'मस्ती'

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावरून १५ शहरांसाठी दररोज २० उड्डाणं; एअर इंडियाची सॉलिड योजना

Pregnancy Health Tips: गरोदरपणात लोणचं खाणं आरोग्यासाठी गुणकारी की हानिकारक?

Dnyanda Ramtirthkar: 'लग्नानंतर होईलच प्रेम' ज्ञानदाचं नऊवारी साडीत फोटोशूट

SCROLL FOR NEXT